आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सर पीडित महिलांना जिद्दीने जगण्याचं बळ देणाऱ्या मैत्रिणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अापल्याला कॅन्सर झाला हे कळाल्यानंतर कुणीही खचून जातात. त्यानंतर त्या नकारात्मक विचार करण्यास सुरुवात करतात. ग्रामीण भागातील महिलांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने कर्करोगासारखी व्याधी ते लपवतात. अशा महिलांनी अाजाराला घाबरून जाऊ नका, जिद्दीने लढा, असा सल्ला देऊन त्यांचे मनाेधैर्य वाढविण्यासाेबत त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा भरण्याचे कार्य ‘अाम्ही मैत्रिणी कॅन्सर सपाेर्ट ग्रुपच्या’ सदस्या करीत अाहेत. वर्षांत त्यांनी २२ कॅन्सर पीडित महिलांना समुपदेशन करून जगण्याचे बळ दिले अाहे.
कॅन्सर पीडित महिलांनी एकत्र येऊन ‘अाम्ही मैत्रिणी कॅन्सर सपाेर्ट ग्रुप’ तयार केला अाहे. या कार्यात काही डाॅक्टर, पुरुष देखील सहकार्याची भावना ठेवत ग्रुपला जुळले असून २५जणांची ही टीम कॅन्सरबाबत जनजागृती करीत अाहे. समुपदेशनासह शक्य असल्यास कॅन्सर रुग्णांना ते मदतही करतात. गेल्या अाठ वर्षांपासून ते कुठलीही अपेक्षा ठेवता ग्रामीण भाग, महिला मंडळे, मुलींचे महाविद्यालय, वसतिगृह याठिकाणी महिलांचे प्रबाेधन करीत अाहे. अातापर्यंत ३२ कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी २२ कॅन्सर पीडित महिलांना त्यांनी समुपदेशनामुळे जगण्याचे बळ दिले अाहे.

असा स्थापला ग्रुप
डाॅ.उषाशर्मा अाणि रेवती ठिपसे यांनी कॅन्सरशी झुंज दिल्यावर अापण या अाजारातून बरे झालाे. त्यामुळे इतर महिलांचे प्रबाेधन करावे, असा विचार त्यांच्या मनात अाला. कॅन्सर पीडित महिलांमध्ये नवीन विचार, नवी उमेद, नवी जिद्द देण्यासाठी त्यांनी एप्रिल २००८ मध्ये ‘अाम्ही मैत्रिणी कॅन्सर सपाेर्ट ग्रुप’ स्थापन केला. यात ज्या महिला कॅन्सरशी झुंज देऊन उभ्या राहिल्या अशा काही इतर महिलासुद्धा सहज जुळल्या. काही दिवसांनंतर वैद्यकीय अधिकारी मनीषा दमाणी, डाॅ. तिलेात्तमा गाजरे, अाहारतज्ज्ञ डाॅ. मृदुला कुळकर्णी, डॉ. श्रद्धा चांडक यांनीदेखील ग्रुपचे कार्य करण्यास सुरुवात केली. ग्रुपमध्ये काेणी अध्यक्ष किंवा सचिव नाही. प्रत्येक जण हा नि:स्वार्थपणे काम करीत अाहे.

रुग्णांपर्यंत पाेहोचून मार्गदर्शन
ज्याना कॅन्सर झाला अाहे, त्यांच्याशी ग्रुपच्या महिला हाॅस्पिटल, घरी जाऊन प्रत्यक्ष संवाद साधतात. या वेळी त्यांना धीर देऊन त्यांचे मन हलके करतात. मग त्यांना सकारात्मकतेचा विचार देऊन उपचार घेण्यासाठी प्राेत्साहन देण्याचे काम करतात.

नवीन उमेद मिळाली
^कर्कराेगझाल्याचेकळल्यानंतर मी अर्धी खचून गेली हाेती. खूप तणावात असताना मला अाम्ही मैत्रिणी ग्रुपने अाधार दिला. रेवती ठिपसेंसह सर्व सदस्यांनी माझ्याशी वेळाेवेळी संपर्क साधून माझे मनाेधैर्य वाढवले. सकारात्मकतेमुळे माझ्यावर उपचाराचाही परिणाम झाला अाणि मी पूर्णपणे बरी झाली. अंजली बाविस्कर, कर्कराेग पीडित

जिद्दीने प्रयत्न सुरू
^अाम्ही जाेत्रास सहन केला ताे इतर महिलांना हाेऊ नये, हाच विचार अामचा असताे. सकारात्मक विचाराने अाम्ही महिलांचे प्रबाेधन करीत असून जिद्दीने अामचे प्रयत्न सुरू अाहेत. महिलांना मार्गदर्शन करताना अनेकदा त्या गांभीर्याने घेत नाही पण त्यांना व्यवस्थित समजवले तर त्या एेकून घेतात. डाॅ. उषा शर्मा.