आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकरखाली येऊनही दोघे बचावले, खेडी शिवारातील हॉटेल जान्हवीच्या समोरील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महामार्गावरीलखेडी शिवारातील हॉटेल जान्हवीच्या समोर रविवारी दुपारी १२.३० वाजता सायकल, मोटारसायकल आणि टँकरचा विचित्र अपघात झाला. त्यात मोटारसायकलस्वार युवक आणि सायकलस्वार विद्यार्थिनीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या वेळी जमावाने टँकरच्या काचा फोडल्या.

कोल्हे विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी मानसी हेमंत पाटील (वय १७, रा. अयोध्यानगर) ही क्लास संपल्यानंतर सायकलने घराकडे जात होती. जान्हवी हॉटेलसमोर महामार्ग क्रमांक ओलांडत होती. त्या वेळी भुसावळकडून कैलास लक्ष्मण नेमाडे (वय २२, रा. गीताईनगर), युवराज पीतांबर भंगाळे (२५, ज्ञानदेवनगर) हे मोटारसायकलने (एमएच- १९, बीएच- ९९०५) येत होता. मानसी अचानक समोर दिसल्याने त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांची मोटारसायकल रस्त्याखाली उतरून घसरत मानसीच्या सायकलवर आदळली. याचवेळी समोरून येणाऱ्या गॅसच्या टँकर (एमएच- ४३, यू- २१२४) खाली सायकल आणि मोटारसायकल घुसली. टँकरचालकाने मानसी मोटारसायकलस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र यात मानसीच्या उजव्या पायास आणि युवराजच्या डाव्या पायास गंभीर दुखापत झाली. तर मोटारसायकलचालक कैलास बाजूला फेकला गेल्याने त्याला मुकामार लागला.