आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण सुटल्यामुळे कार सलून दुकानास धडकली, जामनेरच्या दाेघा भावांसह मेव्हण्याचा अपघाती मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - कार वरीलताबा सुटल्याने मलकापूरजवळील वाघूळ गावाजवळ होंडा आयकॉन ट्वेन्टी ही गाडी शुक्रवारी सलून दुकानावर धडकली. या अपघातात जामनेर येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन संख्या भावांसह मेव्हण्याचा समावेश असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळगावातील रुग्णालयात दाखल केले आहे.

भागवत शेनफडू गिते, श्रीकृष्ण धनराज घोंगडे, बाबुराव धनराज घोंगडे सुदाम भिकन चौधरी हे शुक्रवारी सकाळी दत्तात्रय धनराज घोंगडे यांच्या कारने अकोला येथे साखपुड्याला जाण्यासाठी निघाले. मलकापूर सोडून नांदुरा रोड लागताच चालक दत्तात्रय घोंगडे यांचा कारवरील ताबा सुटला रस्त्याच्या कडेला ढाब्याला लागून असलेल्या एका सलूनच्या दुकानाला कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की, अर्धे दुकान जमीनदोस्त होऊन दत्तात्रय घोंगडे (वय ५८) श्रीकृष्ण घोंगडे (६५) या दोन भावांसह मेव्हणे भागवत गिते (६७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाबुराव धनराज घेंगडे (५५) सुदाम चौधरी (४५) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर मलकापूर येथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगावला हलवण्यात आले.
एकाचवेळी निघणार तिघांची अंत्ययात्रा : दत्तात्रयघोंगडे यांचे जामनेर येथील जळगाव रोडवरील द्वारकादर्शन पार्क येथे तर त्यांचे बंधू श्रीकृष्ण घोंगडे यांचे वाकी रोडवरील आसाराम बापू आश्रमाजवळ घर आहे. त्यांचे मेव्हणे भागवत गिते यांचे घर पाचोरा रोडवरील दत्तचैतन्यनगर येथे आहे. तिघेही जामनेरातील रहिवासी नातेवाईक असल्याने तिघांची अंत्ययात्रा दत्तचैतन्यनगर येथील गिते यांच्या घरापासून शनिवारी निघणार आहे.

न्हावीबचावला : घोंगडेहे सहकाऱ्यांसह आपल्या कारमधून भरधाव वेगाने अकोल्याकडे निघाले होते. वाघूळजवळ ताबा सुटल्याने कार एका सलूनच्या दुकानात शिरली. या धडकेत सिमेंट काँक्रीटचे बांधलेले दुकान होत्याचे नव्हते झाले. धडक लागण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वीच न्हावी दुकान झाडून केर टाकायला बाहेर गेलेला असल्याने तो बचावला. कारमधील दोन्ही एअरबॅग फाटून स्टेअरिंग मागील सिटवर बसलेल्या श्रीकृष्ण घोंगडे यांच्या डोक्याला लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अमेरिकेचे स्वप्न अपूर्ण
दत्तात्रयघोंगडे श्रीकृष्ण घोंगडे हे पहूर येथील मूळ रहिवासी असून नोकरीनिमित्त ते जामनेर येथेच स्थायिक झाले आहेत. दत्तात्रय घोंगडे हे आय.डी.बी.आय.बँकेच्या मुक्ताईनगर शाखेत सहव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना तीन मुली असून धाकटीचा गेल्या १५ दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. धाकट्या मुलीच्या लग्नासाठी थोरल्या मुलीला घेण्याकरिता घोंगडे हे सेवानिवृत्तीनंतर अमेरिकेला जाणार होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या अपघातामुळे घोंगडे यांचे अमेरिकेत जाण्याचे स्वप्न अपूर्णच रािहले .