आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कारचे दरवाजे उघडून बॅगा लंपास, नवीपेठेत पंधरा मिनिटांत 27 हजार पळवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या दोन चारचाकींचे दरवाजे उघडून चोरट्यांनी दोन बॅगा लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १.१५ वाजता घडली. या दोन्ही बॅगांमध्ये २७ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. नवीपेठेतील प्रभात सोडा या दुकानाच्या समोर या चारचाकी उभ्या होत्या. यातील एक बॅग रात्री वाजता मुक्ताईनगर तालुक्यात सापडली. 

उज्ज्वलकुमार नामदेव बोरसे (वय ३२, रा. शांतीनगर भागातील पुखराज पार्क, भुसावळ) हे व्यवसायाने ठेकेदार आहेत. जळगावातील विजया बँकेत काम असल्यामुळे ते शनिवारी दुपारी आपल्या चारचाकीने (एमएच १९ सीपी ००९१) जळगावात आले होते. नवीपेठेतील प्रभात सोडा दुकानाजवळ चारचाकी उभी करून ते बँकेत गेले होते. 
 
चारचाकी लॉक केलेली नसल्याची संधी साधत दोन चोरट्यांनी चारचाकीमध्ये ठेवलेली एक बॅग लंपास केली. या बॅगमध्ये रोख १० हजार रुपये होते. बँकेतील कामे आटोपून अवघ्या १५ मिनिटात उज्ज्वलकुमार हे पुन्हा चारचाकीजवळ आले. त्या वेळी चारचाकीमध्ये ठेवलेली बॅग लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजारच्या काही नागरिक, चारचाकी मालकांकडे विचारपूस केली. मात्र, बॅग सापडली नाही. बाेरसे यांच्या चारचाकीच्या शेजारीच अमित सुंदरलाल सेवानी (वय ३५, रा.अमरावती) यांची चारचाकी (एमएच २७ एआर ८०१७) उभी होती. बाेरसेंनी परिसरात विचारपूस केल्यामुळे नागरिक सतर्क झाले. यात सेवानी यांनीही चारचाकी तपासली. त्यांनी गाडी लॉक केलेली नव्हती. चोरट्यांनी सेवानी यांच्या चारचाकीमधून देखील बॅग लंपास केल्याचे उघडकीस आले. सेवानी यांच्या बॅगेत १२ हजार रुपयांचा मोबाइल रोख पाच हजार रुपये, असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. सेवानी बोरसे या दोघांनी शहर पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे तपास करीत आहेत. 

सीसीटीव्हीत चोरटे कैद : नवीपेठपरिसरात दुकानांबाहेर सीसीटीव्हीे आहेत. यात बोरसे सेवानी यांच्या कारचे दरवाजे उघडून बॅग लंपास करताना दोन चाेरटे दिसत आहेत. 

एक बॅग मुक्ताईनगर तालुक्यात सापडली 
बाेरसेयांची चोरीस गेलेली बॅग मुक्ताईनगर तालुक्यात महामार्गालगत फेकून दिल्याची माहिती सायंकाळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर शहर पोलिसांचे एक पथक बोरसेंसह मुक्ताईनगर येथे रवाना झाले होते. चोरट्यांनी बॅगा लंपास करून मुक्ताईनगरकडे पलायन केले असून रस्त्यात त्यांनी बॅग फेकून दिली असावी,असा संशय व्यक्त करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...