जळगाव - एमआयडीसीपोलिसांच्या पथकाने सोमवारी मुंबईतील कोपरखैरणे येथील कारचोराला अटक केली होती. त्याला दविसांची पोलिस कोठडी मिळाला आहे. कारचोरी करण्यामध्ये त्याचे साथीदार असणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कोपरखैरणे येथून बुधवारी सकाळी वाजता ताब्यात घेतले आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात जून महिन्यात नितीन काटोले (रा. शिरसोली) यांची गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी अनिलकुमार ऊर्फ सुबेश श्रीकांत मिश्रा (वय १८, रा. परसिधी, ता. कोरव, जि. अलाहाबाद, ह.मु. कोपरखैरणे) याला सोमवारी अटक केली होती. त्याने दिलेल्या कबुलीत चोऱ्यांमध्ये आणखी तिघांचा सहभाग असल्याचे सांगितले होते. त्यानुसार एमआयडीसी ठाण्याचे कर्मचारी अशोक अहिरे, रामकृष्ण पाटील, संदीप पाटील, विजय पाटील, किशोर पाटील यांनी बुधवारी कोपरखैरणे येथून रोहित रमाशंकर तविारी (वय २२, रा. महूगड, जि. मिर्झापूर, ह.मु. कोपरखैरणे), अमित बिंदवासनी शुक्ला (वय २१, रा. अलाहाबाद, ह.मु. कोपरखैरणे) दोघांना ताब्यात घेतले आहे.
अर्धातास पाठलाग करून एकाला पकडले
बुधवारीसकाळी वाजता अमित शुक्ला याला पोलिसांनी कोपरखैरणे येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. तर त्याचा दुसरा जोडीदार रोहित तविारी हा कोपरखैरणे येथील एमआयडीसीतील डब्ल्यू- २१८ येथे कंपनीत नोकरीला आहे. तो बुधवारी सकाळी कामावर गेलेला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक एमआयडीसीत गेले. मात्र, त्याचा सुगावा रोहितला लागल्याने त्याने कंपनीतून कामसाेडून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याचा अर्धातास पाठलाग करून त्याला पकडले.
गाड्या ताब्यात मिळण्यासाठी कसरत
पोलिसांनाकारचोर मिळाले. मात्र, त्यांनी चोरलेल्या कारचा शोध लावणे कठीण जाणार आहे. कारण या चोरट्यांनी चोरलेल्या कार राज्यासह छत्तीसगड, उत्तर प्रदेशात विकल्याची कबुली दिली आहे. मात्र, काही गाड्या या चोरट्यांनी अलाहाबादमार्गे नेपाळमध्ये विकल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना गाड्या ताब्यात मिळविण्यास कसरत करावी लागणार आहे.