आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या खिडकीची काच फोडून बॅग लांबवली, पाळत ठेवून चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवतीर्थमैदानाला लागूनच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या खिडकीची काच फोडून चाेरट्यांनी गाडीतील बॅग लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली. या बंॅगेत ३५ हजार रुपये राेख, ग्रॅम सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा ८७ हजारांचा ऐवज हाेता. कार मालकाने गाडी उभी केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत चाेरट्यांनी ही बॅग चाेरी केली. विशेष म्हणजे काेर्ट चाैक रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. तरीदेखील चाेरट्यांनी सहज चाेरी केल्याने त्यांना पोलिसांचा धाक नसल्याचे पुन्हा एकदा या घटनेमुळे समाेर अाले अाहे. 
 
मूळ भडगाव येथील सध्या खाेटेनगरात राहणारे मनोज पंढरीनाथ मराठे हे जळगावात औषध तयार करणाऱ्या एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. मंगळवारी ते भडगाव येथून त्यांची आई प्रमिला मराठे यांना जळगावात घेऊन आले होते. शिवतीर्थ मैदानासमोरील कान, नाक, घसाच्या दवाखान्यात त्यांनी तपासणीसाठी नोंदणी केली होती. दुपारी १२ वाजता दवाखान्यात जाण्यासाठी त्यांनी शिवतीर्थ मैदानाच्या कंपाउंड बाहेर कार (क्रमांक एमएच-१९, एवाय ८८९१) लावली. डॉक्टरांकडे जाऊन दोघे मायलेक १५ मिनिटांत पुन्हा कारजवळ आले. त्या वेळी त्यांना कारच्या उजव्या बाजूला असलेल्या दरवाजाची काच फोडून चाेरट्यांनी सीटवर ठेवलेली लॅपटॉपची बॅगही लंपास केल्याचे दिसले. या बॅगमध्ये ३५ हजार रुपये रोख, ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा सुमारे ८७ हजार रुपयांचा ऐवज हाेता. या घटनेबाबत मराठे यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचानामा करून अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 
नियोजनबद्धरीत्या चाेरी 
चोरट्यांनीअगदी नियोजनबद्धरीत्या ही चोरी केल्याचा पाेलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला अाहे. कारण कारची उजवी बाजू शिवतीर्थ मैदानाच्या कंपाउंडला लागून दाेन फूट अंतरावर होती. कंपाउंडच्या भिंतीला जाळी आहे. त्यामुळे चाेरट्यांना आतून दगड मारून काच फोडणे सहज शक्य होऊ शकते. रस्ता वर्दळीचा असल्यामुळे काच फुटण्याचा आवाजही दाबला जाऊ शकतो. काच फुटल्यानंतर ही पाच फुटाची भिंत ओलांडून सहजपणे काही सेकंदात बॅग लांबवणे चोरट्यांना शक्य होऊ शकते. या सर्व शक्यतांचा वापर करून चोरट्यांनी कारवर पाळत ठेवली असावी. त्यानंतर नियोजन करून काही मिनिटांतच चारेट्यांनी मराठेंच्या कारमधून बॅग लांबवल्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. 
 
चोरटे अल्पवयीन असल्याचा संशय 
शिवतीर्थमैदानावर दिवसभर अनेक शाळकरी मुले खेळत असतात. याच गोंधळात चोरट्यांनी संधी साधली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे चाेरटे अल्पवयीन असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मराठे यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी शिवतीर्थ मैदानासह शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात तपासणी केली. 
 
चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद 
मराठेयांनी ज्या ठिकाणी कार उभी केली होती, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. वैद्यनाथ बँकेच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला आहे. दुपारी वाजून ३३ मिनिटांनी त्याने कारची काच फोडून बॅग लांबवली आहे, तर १.३७ वाजता मराठे कारजवळ पोहाेचले त्या वेळी चोरटा बॅग घेऊन पायीच चालत गेला आहे.
 
त्याने चोरी केलेल्या लॅपटॉपची बॅग स्टेडियमजवळ सायंकाळी मिळून आली. त्यातील वस्तू, पैसे, सोने काढून घेतले आहे. मिळालेल्या फुटेजवरून पाेलिस तपास करीत आहेत. चोरट्याने पांढरा शर्ट खाकी रंगाची पॅन्ट घातली असून, तो विद्यार्थीच असण्याची शक्यता वाढली आहे. 
बातम्या आणखी आहेत...