आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निगा पावळ्यातील : पावसाळ्यापूर्वी घ्या मोटारसायकलीची काळजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता पावसाळ्यात वाहन चालविणे किती जिकिरीचे ठरू शकते याचा अंदाज तुम्हाला येईलच. शहरातील प्रत्येक भागात उखडलेले रस्ते आणि मोठे खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. याच परिस्थितीत पावसामुळे तुमचे वाहन सुस्थितीत घरी पोहोचेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी किमान आपल्या वाहनाची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी. विशेषत: महिलांनी दुचाकीची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा पावसात गाडी बंद पडल्यास फजिती होण्याची शक्यता आहे. दुचाकीची काळजी घेतल्यास पावसातही तुम्ही वेळेत कामे पूर्ण करू शकाल.

टायर, ब्रेक्स, लायनर्स, काचा, सस्पेन्शन्स, वायरिंग या प्रमुख बाबी दुर्लक्ष करून चालले आहे. महामार्ग किंवा ग्रामीण भागातील रस्ते नेहमीसारखीच राहत नाहीत. अनेकदा रस्त्याचा बाजूला माती टाकलेली असते. काही वेळा ती टाकलेलीही नसते. त्यामुळे एक प्रकारची घळ किंवा खाचेचा रस्ताच तेथे तयार होतो. अशा वेळी गाडीचे चाक रुतण्याची किंवा रस्त्याच्या कडेला पडण्याची शक्यता अधिक असते.
अन्यथा शॉर्ट सर्किटचा धोका
पावसाळ्यापूर्वी दुचाकीची संपूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक आहे. निष्काळजीपणा केल्यास विनाकारण 1000 ते 2000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. विशेषत: महिला, तरुणींनी दुचाकीची बॅटरी, स्टार्टर तपासून घेणे आवश्यक आहे. कारण ऐन पावसात गाडी सुरू न झाल्यास फजिती होऊ शकते. ब्रेक लायनरही तपासून, इग्निशन कॉइलची वायरिंगकडेही लक्ष द्यावे. अजित ढवळे, संचालक, स्कील्ड सर्व्हिसेस
ब्रेक्स, लायनर्स, सस्पेन्शन्स, टायरची देखभाल याकडे विशेष लक्ष द्या
*हेडलॅम्पचा प्रकाश नीट पडतो की नाही, त्याचे रिफ्लेक्टर्स चांगले आहेत का नाही हे तपासून पाहा.
*लोखंडी साधनांना गंज प्रतिबंधक लावावे. विशेषत: दुचाकीच्या लोखंडी भागांना, सायलेन्सर, रॉड्सबाबत ही काळजी घ्यावी.
*कारच्या सर्व दरवाजांची बिजागिरे पांढर्‍या ग्रीसने लेपून घ्या.
*पाण्यातून जाताना मोटारीच्या फ्लोअरिंगमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. फ्लोअरिंगवरील रबर मॅटखाली डांबराच्या गोळ्या टाकून घ्या.
*ब्रेक्स, लायनर्स, सस्पेन्शन्स, टायरची देखभाल व बदलीची, गतीवर योग्य नियंत्रण या प्राथमिक बाबींकडे विशेष लक्ष द्या.
* प्लास्टिकचे खराब झालेले भाग, गंजलेले नटबोल्ट, स्क्रू बदलून घ्या.
*गंजलेले किंवा फुटलेले सायलेन्सर तातडीने बदलून घ्या.
*मोटारसायकलचा स्टँड व्यवस्थित आहे किंवा नाही हे तपासून पाहा. त्याच्या स्प्रिंगमध्ये ग्रीस किंवा ऑइल टाकून व्यवस्थित करून घ्या.
*सीटचे फोम तपासून पाहा. त्याच्यावर प्लास्टिक कव्हर घालून घ्या.
*हँडलला कव्हर घाला
*मोटारसायकलीला पुढील बाजूने चिखल उडू नये म्हणून प्लास्टिकचा पुठ्ठा लावावा
* मडफ्लॅप तपासून तो अवश्य बदला
* हेडलॅम्प, स्टार्टर, साइड इंडिकेटर यांचे स्विच व्यवस्थित आहे किंवा नाही ते तपासून पाहा
*ब्रेक, क्लच, एक्सलेटरच्या वायर तपासून पाहा
*टेल लॅम्प, साइड इंडिकेटर, हेडलॅम्प, रिफ्लेक्टर तपासा.