आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोद रायसोनींसह चौघांविरुद्ध गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बीएचआर पतसंस्थेत ठेवलेली तीन लाखांची मुदत ठेव बनावट स्वाक्षरीने परस्पर वटवून फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमनसह चौघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास कॉलनीत राहणारे राजकुमार लक्ष्मीनारायण कोगटा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात हा आदेश देण्यात आला आहे.

राजकुमार यांच्या तक्रारीत त्यांची पत्‍नी सारिका यांच्या नावे दीड लाखांच्या दोन अशा तीन लाख रुपयांच्या ठेव पावत्यांवर अजयकुमार लक्ष्मीनारायण कोगटा यांनी बनावट स्वाक्षर्‍या करून रक्कम वटवून घेतली. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुकलाल शहादू माळी, चेअरमन प्रमोद रायसोनी, दिलीप चोरडिया व अजयकुमार लक्ष्मीनारायण कोगटा या चौघांनी संगनमत केले. तसेच या चौघांनी सारिका यांच्या नावे पतसंस्थेत असलेल्या 6 लाख 10 हजार रुपयांच्या ठेवीही पतसंस्थेतून मिळू दिल्या नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कुबेर चौरे करीत आहेत.