आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुटुंबावर बहिष्कार; करजकुपे येथील 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करजकुपे येथील धनंजय पाटील याने गावातीलच गायत्री नावाच्या युवतीशी लग्न केले - Divya Marathi
करजकुपे येथील धनंजय पाटील याने गावातीलच गायत्री नावाच्या युवतीशी लग्न केले

नंदुरबार- समाजातील सगोत्रातील मुलीशी प्रेमविवाह केल्याने तालुक्यातील करजकुपे येथील नागरिकांनी प्रेमविवाह करणाऱ्या दांपत्यासह त्याच्या कुुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. या प्रकरणी धनंजय पाटील याने उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार करजकुपे येथील १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


करजकुपे येथील धनंजय पाटील याने गावातीलच गायत्री नावाच्या युवतीशी लग्न केले. त्यानंतर लेवापाटीदार समाजातील १२ जणांनी गावात बैठक बोलावून धनंजय पाटील यांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...