आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्यांचा एपीअाय नसताना मान्यता, काेर्टात खान्देशातील सहा प्राचार्यांविराेधात याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सहा महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे एपीआय (ऍकॅडमिक परफॉर्मन्स इंडेक्स) ४०० पेक्षा कमी असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा अारोप करीत सामाजिक कार्यकर्ते कुंदन धर्मा तायडे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
 
विद्यापीठाने यूजीसीचे निर्देश डावलत काही प्राचार्यांचे एपीआय ४०० पेक्षा कमी असल्यानंतरही त्यांना मान्यता दिली. याविराेधात शिक्षण सहसंचालक कुलपतींकडे तक्रार केली. त्यानंतरही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कुंदन तायडे यांनी अाैरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत संबंधितांना मे २०१७ पर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे अादेश दिले अाहेत.
 
याचिकेत या प्राचार्यांची नावे
डॉ.अशोकपाटील (शहादा महाविद्यालय), डॉ.संभाजी देसाई (पंकज महाविद्यालय, चोपडा), डॉ.सुभाष महाले (कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, शहादा), डॉ.मंगला साबद्रा (कोटेचा काॅलेज, भुसावळ), डॉ.ए.जी.जायस्वाल (अग्रवाल विज्ञान महाविद्यालय, नवापूर), डॉ.एस.व्ही. देवरे (कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार).
बातम्या आणखी आहेत...