आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांची फसवणूक; अाैरंगाबादच्या कावेरी सिड्सवर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासनाच्या पीक संरक्षण अधिनियमाच्या अटी शर्तींचे पालन करता शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबादच्या कावेरी सिड्स कंपनीचे सतीश प्रभाकर पाठक यांच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अमित चुडामण पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कावेरी सिड्स कंपनीविरूद्ध महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. दरम्यान, राज्यात अवैध कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भ खान्देशात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हाेता. या घटनेनंतर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे अादेश शासनाने दिले हाेते. 


कृषी कार्यालयात शिवसेनेने केले दाेन तास ठिय्या अांदाेलन 
बोगसबीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने गुरुवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तास ठिय्या आंदोलन केले. शेवटी चर्चेअंती तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन कृषी अधिकारी सुनील सोनवणे यांनी आंदोलकांना दिले. 


गेल्या महिनाभरापासून बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून याची शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे तत्काळ नुकसानग्रस्त कापसाच्या पेऱ्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा, अशीही मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. या वेळी गजानन मालपुरे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, महानगरप्रमुख शरद तायडे, कुलभूषण पाटील, दिनेश जगताप, राहुल नेतलेकर, शोभा चौधरी, भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, विलास मुळे यांच्यासह इतर पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते. या वेळी एका शेतकऱ्याने कापसाचे झाड कृषी अधीक्षकांच्या टेबलावर ठेऊन अळी दाखवली. 


आजपासून पंचनामे...
सोनवणेयांचे व्हिडिओ कॉंन्फरन्सद्वारे प्रधान सचिवांशी बोंड अळीसंदर्भात बोलणे झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे शुक्रवारपासून केले जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...