आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Case Of Attack On Police Officer : Two Arrested ; Corporator Run Away With Son

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस अधिका-यावरील हल्‍लाप्रकरण : दोघांना अटक ; नगरसेवक मुलासह फरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी विजय जाधव व बंटी ऊर्फ राकेश रोकडेला अटक केली. तर नगरसेवक चंद्रकांत सोनार, त्यांची मुले देवेंद्र ऊर्फ देवा, भूषणसह 20 जणांवर गुन्हा दाखल झाला. आरोपी नगरसेवक मुलांसह फरार आहे.

होळीच्या दिवशी जुने धुळे परिसरातील दोन गटामध्ये वाद झाला होता. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक धनंजय विक्रम पाटील यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सचिन आणि देवा ऊर्फ देवेंद्र चंद्रकांत सोनारला ताब्यात घेतले होते. त्यातून देवा समर्थकांचा जमाव चालून आला. त्यांनी पाटील यांच्याशी हुज्जत घातली. तसेच देवाने पाटील यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. तर भूषण यानेही पोलिस कर्मचारी संजय बोरसे यांच्यावर तलवारीने वार केला होता.