आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवर गोपनीय कोड विचारून लुटले 43 हजार रूपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महावीरनगरात राहणा-या मनोज शहा यांना मोबाइलवरून पिनकोड विचारून त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांतून ४३ हजार ४९९ रुपये काढून घेतल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. मात्र, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी गुन्हा दाखल करून घेण्यात नकार दिला आहे.
शहा हे एसी दुरुस्तीचे काम करतात. त्यांना ३० डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ०८०५१४०५४८५ या क्रमांकाच्या मोबाइलवरून फोन आला. त्यावर एसबीआयच्या दिल्ली येथील मुख्य शाखेतून पवन शर्मा बोलत असून, तुमच्या बँक अकाउंटचा कोड लॉक होणार आहे. त्यामुळे अकाउंटची माहिती द्या, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यावर एटीएम कार्ड घरी असल्यामुळे शहा यांनी नंतर सांगतो, असे उत्तर दिले. शर्माने पाठपुरावा करून पुन्हा वाजता फोन केला. या वेळी शहा यांनी त्यांच्या स्टेट बँकेचा अकाउंट क्रमांक एटीएमचा काेड त्यास सांगितला. त्यानंतर त्याने काेड मॅच होत नसल्याचे सांगून आणखी कोणत्या बँकेत खाते आहे? अशी विचारणा केली. त्यानुसार शहा यांनी फेडरल बँकेचीही माहिती दिली. दोन दिवसांत शहांच्या दोन्ही बँकांच्या अकाउंटमधून ४३ हजार ४९९ रुपये विड्राॅवल झाले.
पोलिसांची टोलवाटोलवी - बँकांतूनखात्री झाल्यानंतर शहा सोमवारी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी अशा प्रकारच्या केसेसमध्ये गुन्हा दाखल होत नसल्याचे उत्तर देऊन त्यांना माघारी पाठवले.
टप्प्याटप्प्याने काढले पैसे
शर्मानावाच्या ठगाने ३० आणि ३१ डिसेंबर रोजी स्टेट बँकेतून चार वेळा फेडरल बँकेतून चार वेळा पैसे काढले. पैसे विड्राॅवल होत असल्याचे मॅसेज मिळाल्यानंतर शहा गोंधळले. त्यामुळे त्यांनी सोमवारी बँकांमध्ये जाऊन चाैकशी केली असता, पैसे काढले गेल्याची माहिती मिळाली.
कुणालाही अापल्या एटीएमचा पिनकोड देऊ नका असे बँकातर्फे वारवार आवाहन करण्यात येते. तसेच पिनकोड विचारून फसगत फसगत झाल्याच्या घटनाही घडता तरी देखील नागरिक निष्काळजीपणे अनोळखी व्यक्तीचा फाेन अाल्यानंतर एटीएमचा िपनकाेड देतात. त्यामुळे नागरिकांनी कुणालही अापल्या गाेपनीय पिनकाेडची मािहती देऊ नये. कुणी जर पिनकाेड िवचारात असेल तर लागलीच पाेिलसांना िकंवा बंॅकेला माहिती कळवावी. यापूर्वी शहरात अशा दाेन घटना घडल्या अाहे. यात पहिला िजल्हापेठ तर दुसरा एमअायडीसी पाेिलस ठाण्यात गुन्हा दाखल अाहे.