आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीच्या प्रकरणामध्ये पाेलिसांचे परस्परविराेधी खुलासे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बलात्काराचागुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाने जिल्हापेठ पाेलिसांना एका जणावर गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले हाेते. मात्र, पाेलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले हाेते. त्यानंतर उर्वरित चार जणांनी गुन्ह्यातून नावे वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले हाेते. त्यावर न्यायालयाने पाेलिसांकडून खुलासे मागितले हाेते. मात्र, पाेलिस निरीक्षक तपासाधिकाऱ्यांनी एकाच प्रकरणात दाेन परस्परविराेधी खुलासे सादर केले अाहेत.

न्यायाधीश एस.एस. पाखले यांच्या न्यायालयात जिल्हापेठचे निरीक्षक श्याम तरवाडकर यांनी खुलासा सादर केला हाेता. त्यात न्यायालयाचे अादेश वाचल्याने चुकून पाच जणांवर गुन्हे दाखल केले असल्याने न्यायालयाची माफीही मागितली. तसेच कलम १६९नुसार संबंधितांची नावे गुन्ह्यातून कमी करणार असल्याचे म्हटले हाेते. दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासाधिकारी सुप्रिया देशमुख यांनी सादर केलेल्या खुलाशात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नाेंदवले असून, त्यात पुरेसे पुरावे असल्याचा उल्लेख केला अाहे. त्यामुळे एकाच प्रकरणात पाेलिसांनी परस्परविराेधी खुलासे सादर केले अाहेत. खंडणी प्रकरणात न्या.पाखलेंनी पाेलिसांना पाच जणांवर गुन्हे का दाखल केले? याबाबत कारणे दाखवा नाेटीस बजावली हाेती. या नाेटिशीला स्थगिती मिळावी म्हणून फिर्यादीचे वकील जैनुद्दीन शेख यांनी न्यायालयात अर्ज केला हाेता. त्यानुसार स्थगितीच्या मूळ खटल्यावर एकत्रित निर्णय देण्याचे अादेश न्यायाधीश पटनी यांनी दिले. त्यासाठी अॅड.शेख यांनी सर्वाेच्च न्यायालयातील खटल्यांचे संदर्भ जाेडले. सरकार पक्षातर्फे अॅड.शरद सूर्यवंशी, फिर्यादीतर्फे अॅड.जैनुद्दीन शेख, अॅड.संताेष सांगाेळकर अाणि अाराेपींतर्फे अॅड.रूपाली भाेकरीकर यांनी काम पाहिले.

संशयितांचा अर्ज फेटाळला
संशयितवैशाली विसपुते, भारती म्हस्के अाणि जयश्री झांबरे यांना न्यायाधीश एमक्यूएसएम शेख यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला अाहे. या प्रकरणात त्रयस्थ अर्जदार म्हणून बाजू मांडण्याची परवानगी देण्यायासाठी न्यायाधीश पटनी यांच्या न्यायालयात अर्ज सादर करण्यात अाला हाेता. याप्रकरणी न्यायालयाने फिर्यादी पक्षाचा खुलासा मागवला हाेता. मंगळवारी न्यायाधीश पटनी यांनी संशयितांचा अर्ज फेटाळला.
बातम्या आणखी आहेत...