आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्यांचे घसरले ‘डिटेक्शन’ साहेब, कधी घेणार अॅक्शन?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरासहिजल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून चाेरट्यांनी धुमाकूळ घातला अाहे. सहा महिन्यांत १११ घरफाेड्या तब्बल ४७४ ठिकाणी चाेरीच्या घटना घडल्या अाहेत. दर अाठवड्यात किमान तीन ते चार चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल हाेत आहेत. मात्र, त्या मानाने गुन्हे उघडकीस अाणण्याचे प्रमाण खूप कमी असल्याने पाेलिस प्रशासनाचा चाेरट्यांमधील दरारा कमी झाला का? असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. त्यामुळे अाता पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांनी िजल्ह्यातील गुन्हेगारीचा अालेख कमी करण्यासाठी ठाेस उपाययाेजना करण्याची गरज निर्माण झाली अाहे.
शहराच्या हद्दीत येणाऱ्या सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस अाणण्याची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. चोरी वा घरफोडीमधील चोरट्यांचा शोध घेण्यात केवळ स्थानिक गुन्हे शाखेचे काम सध्या तरी चांगले दिसत अाहे. त्यामुळे इतर पाेलिस ठाण्यांनीसुद्धा अापल्या कामगिरीत सुधारणा करून जळगावकरांना दिलासा देण्याची गरज अाहे, अन्यथा भविष्यात पाेलिस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कमी हाेईल.

खुनाचे सर्व गुन्हे उघडकीस
घरफाेडी अाणि चाेरीचे गुन्हे उघडकीस अाणण्यात पाेलिसांना अपयश अाले असले तरी, जिल्ह्यात झालेल्या ३७ खुनाच्या गुन्ह्यांतील ३७ गुन्हे उघडकीस अाले अाहेत. दराेड्याच्या २३ गुन्ह्यांपैकी २०, तर जबरी चाेरीच्या ६४ गुन्ह्यांपैकी ४४ गुन्हे उघडकीस अाले अाहेत.

लवकरच सकारात्मक बदल
चोरीघरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आमच्या स्तरावर आवश्यक उपाययोजना तयार केल्या आहेत. लवकरच त्या अमलात आणून गुन्हे उघडकीस येणार आहेत. त्यामुळे लवकरच सकारात्मक बदल दिसणार आहे. डाॅ.जालिंदरसुपेकर, िजल्हा पाेलिस अधीक्षक

घरफाेड्या उघड करण्यासाठी प्रयत्न
^शहरातसुरू असलेल्या घरफाेड्यांचे गुन्हे उघड करण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. त्यासाठी िहस्ट्रीशिटरला ताब्यात घेऊन अनेक गुन्हे उघड करण्यास मदत झाली अाहे. तसेच घरफाेड्या अािण चाेरीचे गुन्हे उघड हाेण्याची टक्केवारी इतर िजल्ह्यांपेक्षा जास्त अाहे. प्रभाकररायते, पाेलिस िनरीक्षक, स्थािनक गुन्हे शाखा

सहा महिन्यांतील घडलेल्या उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची संख्या
चाेरीचे गुन्हे उघडकीस अाणण्यात पिछाडी
जानेवारीते जून २०१५अखेरपर्यंत १११ ठिकाणी घरफाेडीच्या घटना घडल्या. त्यातील २८ घरफाेड्यांतील अाराेपींना पकडण्यात अाले अाहे. तसेच ४७४ ठिकाणी चाेरीच्या घटना घडल्या. त्यातील १७५ घटना उघडकीस अाल्या. मे २०१५मध्ये २० घरफाेड्यांपैकी केवळ ३, तर जून महिन्यात २३ घरफाेड्यांपैकी केवळ गुन्हे उघडकीस अाणण्यात पाेलिसांना यश िमळाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...