आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धरणगाव तालुक्यात 69 बेजबाबदार शिक्षकांवर गुन्हे दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १५ ते ३० नाेव्हेंबरपर्यंत मतदारांची माहिती संकलित करण्याचे काम करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील शिक्षक असलेल्या ६९ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलअाे) गुन्हा दाखल करण्यात आला. 


मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण या कार्यक्रमांतर्गत मतदारांची माहिती संकलित करणे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना बंधनकारक करण्यात आले होते. या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचे अादेश जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार धरणगाव तालुक्यातील १४३ बीएलओंपैकी ६९ बीएलओंनी हे काम केले नाही. यामुळे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी शुक्रवारी धरणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या सर्वांवर भादंवि कलम १८८सह लोकप्रतिनिधी कायदा कलम १९५० चे ३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात अालेला आहे. अाता जळगाव तालुक्यातील बीएलओंवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...