आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅशलेस व्यवहार वाढले; लेस कॅशमुळे गोची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात नोव्हेंबर रोजी चलनातील ५००,१००० रुपयांच्या नोटा बाद करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यानंतर नागरिकांनी आपल्याकडील जुन्या नोटा बँकेतून बदलवून घेतल्या आहेत, काहींनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या नोटांतून थकीत करांचा भरणा केला आहे. मात्र, महिनाभरापासून सर्वसामान्य नागरिकांना नोटबंदीचा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, नागरिकांना दोन हजारांची नवीन नोट मिळत असली तरी, सुट्या पैशांअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ५०० रुपयांची नवीन नोट बँकांमध्ये आलेली नाही. ९० टक्के एटीएम बंदच अाहेत. शहरांमध्ये स्थिती बरी असली तरी ग्रामीण भागात लाेक हजार रुपयांसाठी दिवसभर रांगेत उभे राहत अाहेत. पेट्राेलपंप, रेल्वे, बस, हाॅटेल, हाॅस्पिटल, छाेटे व्यावसायिकयांना स्वॅप मशीन देण्याबाबत बँकांना अादेश नाहीत.
३१ डिसेंबरपर्यंत डेबिट कार्ड, नेटबँँकिंगद्वारे व्यवहार करणाऱ्यांना टॅक्स द्यावा लागणार नसल्याची घाेषणा करण्यात अाली हाेती. प्रत्यक्षात मात्र या घाेषणेची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही, अशा तक्रारींचा पाढा नागरिकांनी सुरू केला आहे. निर्णय १०० टक्के चांगला असला तरी अंमलबजावणी पर्यायी व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले.
स्वाइप करण्याचे प्रमाण वाढले
नाेटबंदी अगाेदर काही विशिष्ट प्रमाणात जवळपास १२ टक्के नागरिक कार्ड स्वाइप करीत होते. मात्र, नाेटबंदीच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांत हे प्रमाण ५५ ते ६० टक्क्यांवर गेले अाहे. बाजारात हळूहळू कॅशलेसचे प्रमाण वाढत आहे. सर्व विभाग कॅशलेससाठी पाठपुरावा करीत आहे. आधीही प्रत्येकाकडे कार्ड होते, परंतु त्याचा वापर केवळ एटीएममधून पैसे काढण्यासाठीच व्हायचा. परंतु स्वॅप मशीन हे हँग हाेतात, दाेन वेळा कार्ड स्वॅप केल्यानंतर एकदा पैसे कट होतात, असे काही गैरसमज आहेत. बँकांनीही व्यवस्थापन बदलावे, ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागते, हे सुधारणे गरजेचे अाहे. अनिलकांकरिया, नवजीवन सुपरशाॅपी संचालक

ग्रामीण भागात अडचणी कायम
ग्रामीणभागात मात्र परिस्थिती हाताबाहेर गेेलेली अाहे. पैसे काढण्याची मर्यादा हजारांपर्यंत असल्याने अाणि एटीएमचा पर्याय नसल्याने ग्रामीण जनतेचे हाल हाेत अाहेत. बँकांचे कार्यक्षेत्र दाेन-चार गावे मिळून असल्याने शेजारच्या गावात पहाटेपासून बँकांपुढे रांगा लावाव्या लागत अाहेत. दिवसभर रांगेत थांबून केवळ हजार रुपये मिळत अाहेत. सुट्या पैशांची चणचण असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्याने उधारीचे व्यवहारदेखील वाढल्याची स्थिती अाहे. नाेटबंदीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण हाेत असताना ग्रामीण अर्थकारण मात्र बिघडलेले असल्याची स्थिती अाहे.

बाजारपेठेवर परिणाम
नाेटबंदी, कॅशलेस व्यवहारांभाेवती जळगावकरांचा संपूर्ण एक महिना खर्ची पडला. बँकेभाेवतीच्या रांगांमध्ये नागरिक गुरफटले गेल्याने त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला. शहरातील सुवर्ण बाजार, दाणाबाजार, रिअल इस्टेट, किरकोळ बाजारपेठेवर ८० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला. सुवर्ण बाजारपेठ ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत बंद अवस्थेत अाहे. कॅशलेस व्यवहार अंगवळणी पडल्याने अाणि भावामध्ये अस्थिरता असल्याने ग्राहक सराफ बाजारापासून लांब अाहेत.

कार्ड स्वाइपवर भर
बाजारात खरेदी करताना कॅशलेसचे प्रमाण वाढले अाहे. नागरिक एटीएम कार्डद्वारे वस्तू खरेदी करीत आहेत. शहरातील मोठ्या सुपरशाॅपी, हाॅटेल, कपडे दुकानात खासकरून प्लास्टिक मनीवरच भर दिला जात अाहे. काेणतीही वस्तू खरेदी करताना अगाेदर स्वॅप मशीन उपलब्ध अाहे का? हा प्रश्न नागरिकांतर्फे विचारला जात असून कॅशलेसकडे ही वाटचाल असल्याचे दिसून येते.
या बाबींवर उपाय नाहीच
- ई-काॅॅमर्स, कॅशलेस व्यवहारांबाबत धाेरण स्पष्ट नाही.
- एक महिना हाेऊनही शहरात ५०० रुपयांची नाेट पाेहाेचली नाही.
- मर्चंट, ई-व्यवहारांवर टॅक्सबंदीच्या घाेषणेनंतरही टॅक्स अाकारणी सुरूच.
- शहरातील ९० टक्के एटीएम महिन्यानंतरही बंदच.
- पेट्राेलपंप, हाॅटेल, हाॅस्पिटल, व्यावसायिकांना स्वॅप मशीन सक्तीचे नाही.
कृषीकेंद्रांकडून स्वॅप मशीनची मागणी
जिल्ह्यातीलनोंदणीकृत कृषी केंद्रांना स्वॅप मशीन बसवण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरावर कृषी केंद्रांकडून मशीनचे मागणी अर्ज मागविले अाहेत. संबंधित बॅंकांकडून दुकानांना स्वॅप मशीन दिले जाणार अाहे. येत्या अार्थिक वर्षापासून या मशीनद्वारे पेमेंट घेण्याची सक्ती केली जाण्याची शक्यता अाहे.

बाजारसमितीचे व्यवहार थांबून
कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये माेठे व्यापारी अजूनही व्यवहार थांबवून अाहेत. भाजीपाला, फळ मार्केटमध्ये सुट्या पैशांचे व्यवहार असतात. दोन हजारांच्या नाेटांमुळे निर्माण झालेली अडचण छाेटे शेतकरी, विक्रेते यांच्यासाठी डोकेदुखी ठरत अाहे. बाजार समितीचे दररोजचे काेट्यवधी रुपयांचे व्यवहार प्रभावित झाले अाहेत. हमाल-मापाडी, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन अाठवड्याला देणे शक्य हाेत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे अाहे.

वादविवादाचे तीन किरकोळ गुन्हे दाखल
नाेटबंदीच्यानिर्णयामुळे सामान्यांची चांगलीच धावपळ हाेत अाहे. पैसे काढण्यासाठी बँका, एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. या रांगांमध्ये दरराेेज कुठेना कुठे किरकाेळ वाद हाेत अाहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून बँक, एटीएम परिसर कुस्त्यांचे अाखाडे झाले अाहेत. या वादातून अातापर्यंत शहर पाेलिस ठाण्यात अाणि जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात असे एकूण तीन अदखलपात्र गुन्हे दाखल झाले अाहेत.

३५०पैकी केवळ १७५ एटीएम सुरू
नाेटबंदीच्यानिर्णयाला बुधवारी एक महिना पूर्ण हाेत अाहे. मात्र, तरीही बंॅकांमध्ये शंभर, पन्नासच्या नोटांचा तुटवडा कायम आहे. रिझर्व्ह बंॅकेकडून असमान पतपुरवठा बंॅकांना करण्यात येत आहे. या नोटांचा तुटवडा तसेच नवीन हजार रुपयांच्या नोटा, एटीएमच्या बिनमध्ये तांत्रिक बदल बाकी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ३५०पैकी १७५ एटीएम सुरू आहेत.

डाॅक्टरही वापरणार स्वॅप मशीन
नाेटबंदी नंतर सगळ्यात जास्त वाद हाॅस्पिटलमध्ये पाहायला मिळाले. ही परिस्थिती टाळता यावी यासाठी अाता शहरातील बहुसंख्य डाॅक्टरांनी बँकांशी संपर्क करून स्वॅप मशीन उपलब्ध करून देण्याची विनंती केली अाहे. त्यामुळे सुटे पैसे नाहीत किंवा माेठी रक्कम खिशात बाळगणाऱ्यांची गैरसाेय टळणार अाहे.

पैशांअभावी कामगारांचे पेमेंट देता अाले नाही
गेल्या१० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात काम करीत अाहे. दर शनिवारी नियमित वेतन दिले जाते. पैशांअभावी कामगारांचे पैसे अदा करता अाले नाही, असा एकही अाठवडा गेला नाही. परंतु, तारखेच्या घाेषणेनंतर गेली दाेन अाठवडे खूपच अडचणीचे जात अाहेत. कामाचे पैसे मालकाकडून उपलब्ध हाेऊ शकत नसल्याने कामगारांना देता येत नाहीत. गाेरखमहाजन, बांधकाम व्यावसायिक.

फाटक्या कुजक्या नाेटा मिळताहेत बँकांतून
अापल्या हक्काचे पैसे बँकेत जमा अाहेत; परंतु अारबीअायच्या नवीन नियमांमुळे केवळ १० ते २० हजार रुपये मिळत अाहेत. बँकांमधून ५०च्या नाेटा दिल्या जात अाहेत. परंतु, सध्या बँकांकडेही पैसे जमा हाेत नसल्याने जुन्या नाेटांचा भरणा हाेत असल्याने कॅशियर त्याच नाेटा पुन्हा ग्राहकांच्या माथी मारत अाहेत - राजेंद्रपाटील, शेतकरी.
बातम्या आणखी आहेत...