आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात ‘कॅशलेस’ व्यापारी संघ, सुट्या पैशांची टंचाई रोखण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्याने बाजारात सुट्या पैशांची टंचाई निर्माण झाली. याचा व्यापारी आणि ग्राहकांना मनस्ताप होतो. यावर तोडगा म्हणून नवशक्ती आॅर्केडमधील व्यापारी संघाने ‘पेटीएम’ची सुविधा सुरू केली आहे. यामुळे सुट्या पैशांच्या टंचाईवर काहीसा दिसाला मिळाला आहे.
शहरात सुट्या पैशांची टंचाई पूर्वीपासून आहे. यामुळे एक ते पाच रुपयांचे चॉकलेट पर्याय म्हणून दिले जाते. परिणामी ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये अनेकवेळा शाब्दिक चकमकी होतात. सुट्या पैशांच्या अडचणीमुळे होणारे हे सर्व उपद्व्याप थांबवण्यासाठी नवशक्ती आॅर्केडमधील व्यापाऱ्यांनी पेटीएम अॅपचा पर्याय निवडला आहे. याद्वारे पैशांची देवाण-घेवाण सुरू झाली आहे. बँकांमध्ये स्वाइप मशीनसाठी अर्ज करावा लागतो. तसेच ती वेळेवर मिळत नाही. या उलट पेटीएमने बरीच सुविधा मिळते. चहावाल्यापासून ते सोने-चांदी विकाणाऱ्यापर्यंत कोणीही पेटीएम वापरू शकतो. यासाठी ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडे विशेषतः बिल देणाऱ्याकडे एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट यापैकी कोणतेही एक कार्ड असणे आवश्यक आहे. मोबाइलमधील इंटरनेट किंवा विक्रेत्यांचे वाय-फायद्वारे पेटीएमच्या सहाय्याने एक रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत पैसे अदा केले जाऊ शकतात. नवशक्ती आॅर्केडमधील नीलेश गोरे, डॉ. आशिश राठी, सतीश टाेलानी, प्रदीप पाचपांडे इतर व्यावसायिकांनी पेटीएम चा पर्याय ग्राहकांसमोर ठेवला होता. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-पुण्यासह अन्य मोठ्या शहरात रिक्षाचालकापासून ते व्यापाऱ्यांपर्यंत पेटीएमचा वापर केला जातो. आर्थिक बदलाचे हे वारे आता भुसावळपर्यंत येवून पोहोचले आहेत. त्यामुळे आगामी काळात याचा वापर अधिक वाढणार आहे.

व्यवहार सुरळीत
बाजारपेठेत सध्या सुट्या पैशांची प्रचंड चणचण भासत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मोबाइल अॅपचा पर्याय अधिक सुलभ आहे. तसेच ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असल्याने अडचण दूर होत आहे.
बातम्या आणखी आहेत...