आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जातपडताळणीप्रकरणी आता दुप्पट शुल्कवाढ, सुधारित दरानुसार आकारणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सामाजिकविशेष साह्य विभागामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी आवेदन अर्जामध्ये दुप्पट शुल्कवाढ केली असून, निश्चित कालावधीत अर्जदाराला या विभागाला जात प्रमाणपत्र पडताळणी द्यावी लागणार आहे.

१५ जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. यात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गातील सेवा प्रकरणे, शैक्षणिक प्रकरणे, निवडणूक विषयक इतर प्रयोजनार्थ जाती प्रकरणांची पडताळणी करण्यात येते. काम अधिक जलदगतीने व्हावे, तसेच पारदर्शकता येण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामार्फत प्रकरणे सादर केली जातात. विद्यार्थीविषयक प्रकरणांसाठी पूर्वी ५० रुपये, सेवापूर्व प्रकरणांसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. यात दुप्पट वाढ झालेली असल्याचे सहायक समाजकल्याण आयुक्त राकेश पाटील यांनी सांगितले. शासनाने ठरवून दिल्यानुसार सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.

सुधारित दर
विद्यार्थीविषयकप्रकरण १००रु.
सेवापूर्वप्रकरणे ३००रु.
सेवांतर्गतप्रकरणे ५००रु.
निवडणूकविषयकप्रकरणे ५००रु.
जातप्रमाणपत्रासाठी अपील ५००रु.