आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मोतीबिंदूमुक्त मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेस जळगावातून सुरुवात; डॉ.तात्याराव लहाने यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- येत्या १८ महिन्यांमध्ये राज्यातील १७ लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ २३ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा रुग्णालयातून करण्यात येणार असून जिल्ह्यातील हजार रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यापैकी १२०० रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असल्याची माहिती डॉ.तात्याराव लहाने यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अाढावा बैठकीत दिली. 


येत्या १८ महिन्यात मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार राज्यातील १७ लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 


हजार रुग्णांची तपासणी 
जिल्ह्यात२१ २२ नोव्हेंबर रोजी चोपडा, यावल, रावेर, बोदवड, भुसावळ, जामनेर,मुक्ताईनगर तालुक्यातील प्राथमिक ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना मोतीबिंदू असेल त्यांना २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हजार रुग्णांची तपासणी एकाच दिवशी जिल्हा रुग्णालयातील वॉर्डात करण्यात येणार आहे. ही तपासणी डॉ. तात्याराव लहाने डॉ. रागिणी पारेख करणार आहेत. शस्त्रक्रिया करतांना दोन्ही डोळ्यांनी अंध, एका डोळ्याने अंध मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...