आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caterpiter Buldozar Muncipal Corporation Jalgaon

‘कॅटरपीलर’ बुलडोजर ठरतोय पालिकेची शान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव शहराला सात वर्ष सुरळीत पाणीपुरवठा आणि चार वर्षांपासून शहराच्या दळणवळणासाठी डोंगराळ व अविकसित भागातील रस्ते उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे 11 वर्षांपासून अखंडीत सेवा देणारा ‘कॅटरपीलर’ कंपनीचा बुलडोझर जळगाव महापालिकेची शान ठरत आहे.
शहराला गिरणा पंपिंगवरुन पाणीपुरवठा केला जात असताना त्या ठिकाणी पक्का बंधारा घालणे शक्य नव्हते. त्यामुळे वाळूचा मोठा बंधारा घालावा लागत होता. मानवी शक्तीने हे काम करणे अतिशय अवघड व धोकेदायक असल्याने नगरपालिकेतर्फे 1999-2000 वर्षात अमेरिक कंपनी ‘कॅटरपीलर’कडून सुमारे 80 लाख रुपये खर्च करून वैशिष्ट्यपूर्ण बुलडोझर खरेदी करण्यात आले होते, आता अशा बुलडोझरची किंमत सव्वा कोटींच्या घरात आहे. एलीव्हेटेड टाइप चैनव्हील असलेले हे बुलडोझर त्या काळातील सर्वक्षेष्ठ यंत्र मानले जात होते. सात ते आठ वर्ष जळगावकरांना सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी गिरणा पात्रात तैनात राहणारे बुलडोझर तीन वर्षांपासून शहरातील
विस्तारीत भागात रस्ते निर्मितीसाठी धडाडते आहे.
कमी खर्चात जास्त काम
कॅटरपीलर कंपनीचे ‘डी-6 एच’ मॉडेल असलेले बुलडोझरला ताशी 18 लिटरपर्यंत डिझेल लागते. मात्र प्रतितास किमान शंभर माणसांकडून न होणारे अवजड काम करून मोकळे होते. एलीव्हेटेड टाईप चैनमुळे अन्य यंत्रांच्या तुलनेत 25 ते 30 टक्के वेगाने काम करण्याची क्षमता या यंत्रात आहे.
मार्ग झाले मोकळे
शहरातील मालधक्क्याकडून निमखेडी मार्गे आहूजानगरलगत महामार्गाला जोडणाºया महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामासाठी हे यंत्र डोंगराळ उंचसखल भाग पोखरुन सपाट रस्ता निर्मितीसाठी काम करत आहे. याच यंत्राने सुप्रीम कॉलनी, संभाजीनगर, कोल्हे हिल्स, रामानंदनगर, शिवकॉलनी या भागातील मोठे रस्ते निर्मितीत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
तर दोन महिन्यात समांतर रस्त्यांचे काम
महामार्गालगत समांतर रस्ते करण्यासाठी महापालिकेला अधिकार मिळाल्यास बांभोरी ते गोदावरी कॉलेजपर्यंत रस्त्यासाठी आवश्यक सपाटीकरण अवघ्या दोन महिन्यात पूर्ण करण्याची क्षमता या यंत्रात आहे. या यंत्राची उपयुक्तता अत्यंत चांगली असून आवश्यक भागांमध्ये रस्ते निर्मितीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी योजना आखल्यास त्या मार्गी लावण्यासाठी हे यंत्र सक्षम आहे.

सहसा अविरत सेवा देणाºया या यंत्रात मोठी खराबी झालेली नाही. मात्र, त्याची नियमित देखभाल दुरुस्ती काळजीपूर्वक करावी लागते. कंपनीने या मॉडेलची निर्मिती बंद केली आहे. त्यामुळे त्याचा एखादा पार्ट गेल्यास त्याच्यासाठी मुंबई किंवा मोठी महानगरे धुंडाळावी लागतात.
आर आर पांडे, शाखा अभियंता, वाहन विभाग