आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता निकालापूर्वीच कळणार गुण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची परीक्षा दिल्यानंतर परीक्षेचे अन्सरशीट इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थी गुणांचे अनुमान काढू शकतील. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना पुढील तयारीसाठी होणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)तर्फे इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे अन्सरशीट स्कॅन करून बोर्डाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाणार आहेत. बोर्डाच्या या सुविधेचा फायदा जेईई परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण बोर्डाच्या परीक्षेचे गुण जेईईच्या स्कोअरमध्ये जोडले जातात. त्यामुळे आता परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना गुणांचे अनुमान काढता येईल.
12वीच्या दोन विषयांचेच अन्सरशीट
बोर्डाच्या दहावीच्या सर्व विषयांचे अन्सरशीट अपलोड केले जाईल, तर 12वीच्या फक्त बायोलॉजी आणि अर्थशास्त्र या विषयांचेच अन्सरशीट अपलोड केले जाईल.
विद्यार्थी देऊ शकतील आव्हान
बोर्डाची परीक्षा 17 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल.त्यानंतर बोर्ड प्रश्नपत्रिका तपासणी सुरू करेल. यादरम्यान इंटरनेटवर अन्सरशीट अपलोड केले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा परफॉर्मन्स कळू शकेल. ही कॉपी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना काही फी जमा करावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रश्नाला किती गुण दिले, हेही विद्यार्थ्यांना कळू शकेल. तसेच गुणांमध्ये गल्लत असल्यास विद्यार्थी त्याआधारे थेट बोर्डाला आव्हान देऊ शकतील.