आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई अभ्यासक्रमात ग्रहणशक्ती वाढवण्याचे प्रात्यक्षिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सीबीएसई आता नवीन सत्रापासून ‘स्पीकिंग अँण्ड लिसनिंग’ असेसमेंट (चाचण्या) सुरू करण्यात येणार आहे. बोर्ड 2013-14 या शैक्षणिक वर्षात एलएसआरडब्ल्यू (लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग व रायटिंग) सुरू करणार आहे.

सीबीएसईचे चेअरमन विनीत जोशी यांनी सांगितले की, वाचनक्षमता वाढवण्यासाठी कादंबरी वाचनाचा अभ्यासक्रमात समावेश केला असून, त्याचे सकारात्मक परिणाम मिळत आहे. ऐकणे आणि बोलणे या एकच नाण्याच्या दोन महत्त्वपूर्ण बाबी आहेत. हा भाषा लॅबोरेटरीजचा परिणाम आहे. त्यात विद्यार्थी कथा ऐकून अडचणी सोडवत आहेत. या शैक्षणिक वर्षात याच कौशल्यावर ग्रेड दिले जाणार असून, याबाबत शाळांना सक्यरुलर मिळणार आहे.

क्लासरूमचा नवा फंडा
इंटरॅक्टिव्ह टीचिंगला ‘क्लासरूम आऊट ऑफ क्लासरूम’ हा फंडा नवे वळण देईल. संवाद साधण्यात भारतीय विद्यार्थी इतर देशांच्या विद्यार्थ्यांपेक्षा मागे पडत आहेत. त्यामुळे आता बोलणे आणि ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी या पद्धतीचा वापर शाळांमध्ये करण्यात येणार आहे. या शिकविण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा विकास होईल.

कौशल्यासाठी गाइडलाइन
> एखादी घटना सांगणे > रिपोर्ट किंवा सारांश सादर करणे
> वर्गात गटचर्चा करणे > वर्गातील चर्चा, सामाजिक विषय

एक नजर ‘सीटीईटी’कडे
> ऑनलाइन अर्जासाठी अंतिम मुदत 6 एप्रिल
> अर्जात झालेल्या चुका सुधारण्यासाठी वेळ 16 एप्रिल ते 26 जून
> ऑनलाइन अर्ज शुल्क : सामान्यांसाठी 500 रुपये, एससी-एसटी, अपंगांसाठी 250 रुपये.
> परीक्षा 28 जुलैला दोन टप्प्यात
> पहिला पेपर इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत
> दुसरा पेपर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत

सीबीएसई शिक्षक होण्यासाठी अर्जात सुधारणेला 72 दिवस मुदत

सीबीएसई शिक्षक होण्यासाठी आवश्यक ‘सीटीईटी-2013’साठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज भरताना झालेल्या विविध चुका सुधारण्यासाठी सीबीएसईने 72 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीएसईची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 26 जुलै रोजी होत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज 6 एप्रिलपर्यंत सीबीएसई/सीटीईटीच्या वेबसाइटवर भरता येणार आहेत. तसेच अर्ज भरताना गडबडीत काही चुका झाल्यास त्या सुधारण्यासाठी 16 एप्रिल ते 26 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत परीक्षार्थींना अर्जात दिलेल्या माहितीत झालेल्या चुकीची दुरुस्ती किंवा इतर बदल करता येणार आहे; मात्र या वेळी चूक झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी काहीच पर्याय उपलब्ध नाही. ही परीक्षा 28 जुलैला सकाळी 10.30 ते 12 व दुसरा टप्पा दुपारी 1.30 ते 3 वाजेदरम्यान होणार आहे.