आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील सर्वच पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील सर्वच पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलिस नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. परिणामी पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही बसवल्यास कामात सुसूत्रता येण्याची अपेक्षा या उपक्रमातून करण्यात येत आहे.

अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असे प्रयोग करण्यात येत आहेत. पोलिस-नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध असल्यास गुन्ह्यांचे नियंत्रण करणे सोपे जाईल, असाही एक समज आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याच्याच तक्रारी अधिक आहेत. या सर्व बाबींचा विचार करता गेल्या वर्षापासून शहरातील पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा विषय समोर आला होता.

जिल्हा नियोजन मंडळासमोरही हा विषय मांडण्यात आला होता. तेथून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यापूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे होते. मात्र, ते सध्या बंद पडले आहेत.

डीपीडीसीतून मिळालेल्या अनुदानातून पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. यासंदर्भात सध्या चाचणी सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. - डॉ.जालिंदरसुपेकर, पोलिसअधीक्षक