आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीजबिलांमुळे २८ सीसीटीव्ही बंद, पुन्हा ४८ कॅमेरे लावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून शहरातील बाजारपेठेत २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र, वीजबिलांचा प्रश्न निर्माण झाल्याने हे सर्व कॅमेरे सध्या बंद आहेत. एकीकडे वीजबिल भरल्याने सीसीटीव्ही बंद असतानाच दुसरीकडे डीवायएसपी कार्यालयाने पुन्हा ४८ सीसीटीव्ही लावण्यासाठी १९ लाख ८२ हजार रुपयांचा प्रस्ताव शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला. यानिमित्त शहरवासीयांना ‘घरचे झाले थोडे अन् जावयाने धाडले घोडे’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे.
बाजारपेठेत वारंवार होणारे वाद, भुरट्या चोऱ्या, उपद्रवींवर लक्ष ठेवण्यासोबतच कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून ‘राेटरी क्लब’ आणि ‘व्यापारी असाेशिएशन’च्या पुढाकाराने शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यानंतर आता पुन्हा ‘डीपीसी’च्या माध्यमातून शहरात १२ ठिकाणी ४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. या कामावर १९ लाख ८२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे संपूर्ण शहरावर तिसऱ्या डाेळ्याचे लक्ष राहणार असून प्रामुख्याने कुठेही अप्रिय घटना घडल्यास पोलिसांना तत्काळ माहिती मिळणे शक्य होईल. उपद्रवींच्या हालचाली कॅमेऱ्यांमध्ये कैद होत त्यांच्यावर कारवाई करता येईल. मात्र, तत्पूर्वी, शहर व्यापारी असाेशिएशनच्या पुढाकाराने बाजारपेठेत लावलेले २८ सीसीटीव्ही कॅमेरे वीजबिल भरल्याने बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यास या कॅमेऱ्यांची मोठीच मदत होत असल्याने डीवायएसपी कार्यालयाने ही समस्या सोडवण्यासाठी देखील पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

कॅमेरे अत्यावश्यक : शहरातसीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय स्तुत्य आहे. मात्र, लावलेले सीसीटीव्ही नेहमी कार्यान्वित असणे आवश्यक आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य नियोजन करावे.

प्रस्ताव पूर्वी रखडला : शहरात सीसीटीव्हीकॅमेरे बसवण्यासाठी डीपीसीतर्फे (जिल्हा नियाेजन समिती) सर्वेक्षण झाले होते. मात्र, दोन वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. शनिवारी पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यामुळे किमान आता तरी प्रत्यक्ष कृती होणे अपेक्षित अाहे.

३ लाखांचे बॅरिकेड‌्स : शहरातनिघणारे माेर्चे, मिरवणुकांसाठी विविध ठिकाणी लावण्यासाठी बॅरिकेड्स आवश्यक असतात. नव्याने ४५ बॅरिकेड‌्ससाठी पोलिस प्रशासनातर्फे तीन लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात १० बॅरिकेड‌्स फोल्डींगचे असतील.
प्रत्यक्ष कृती होणे अपेक्षित

येथे लावणार कॅमेरे
जळगाव राेडवरील वाय पाॅइंट, सरदार वल्लभभाई पटेल पुतळा चाैक, महात्मा गांधी पुतळा चाैक, हंबर्डीकर चाैक, बाजारपेठ पाेलिस स्टेशन चाैक, पांडुरंग टाॅकीज, नाहाटा काॅलेज चाैक, रेल्वे स्टेशन चाैक, डाॅ. अांबेडकर पुतळा चाैक, जाम माेहल्ला, अमरदीप टाॅकीज चाैक, रजा टाॅवर चाैक, खडका चाैफुली येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.

रोटरीने घेतला पुढाकार
गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर राेटरी क्लब अाॅफ ताप्ती व्हॅलीतर्फे शहरात सीसीटीव्ही लावले. काही ठिकाणी कॅमेरे बसवण्याचे काम अद्यापही सुरू अाहे. खडकाराेड, डाॅ. बाबासाहेब अांबेडकर चाैक, स्टेशन परिसर, जामनेर राेड येथील कॅमेरे कार्यान्वित झाले असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन लाख रुपये खर्च झाला. आणखी दोन टप्प्यात कॅमरे बसवू, असे राजीव शर्मा यांनी सांगितले.

Ãशहरात नवीनकॅमरे लावण्याचा प्रस्ताव पाठवला अाहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. -राेहिदास पवार,डीवायएसपी, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...