आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीच्या आधारे बॅटरीचोरांचा छडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातीलवाडी भोकर रोडवरील यश क्लासेससमोर लावलेल्या मोटारसायकलची बॅटरी चोरीस गेली होती. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यास पकडण्यात आले. त्याच्याकडून मोटारसायकलसह चोरीची बॅटरी जप्त करण्यात आली.
लक्ष्मी कॉलनीत राहणारे विशाल प्रकाश जोशी यांची मोटारसायकल (क्र.एमएच. १८-एएस ४०४२) यश क्लासेससमोर पार्किंग केली होती. या मोटारसायकलची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.२६) लांबवली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली. त्यानंतर याप्रकरणी नितीन संजय पाटील (१९, रा. महालक्ष्मी चौक, इंदिरानगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर चोरीस गेलेली बॅटरी गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. नितीनचा दुसरा साथीदार भूषण पांडुरंग बागुल (रा. वलवाडी, वडेल रोड) याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपूरचे निरीक्षक डी. पी. पवार यांच्या पथकातील सहायक उपनिरीक्षक युवराज बोरसे, पोहेकॉ वीरेंद्रसिंग गिरासे, अशोक पवार, कैलास पवार, संदीप कदम, संदीप पाटील, होमगार्ड भूषण अजित ठाकूर यांनी ही कारवाई केली. पोलिस हेडकॉन्स्टेबल वीरेंद्रसिंग गिरासे तपास करीत आहेत.