आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात सीसीटीव्हीची नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी शहरातील काही चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. जळगाव पोलिस आणि युवाशक्ती यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य व संवेदनशील चौकांमध्ये १० फूट उंच कंट्रोलरुम उभारण्यात येणार आहे. यात पोलिस आणि युवाशक्तीचे स्वयंसेवक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मॉनेटरिंग करणार आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या दविशी सीसीटीव्हीच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. तसेच लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जाणार आहे. यासंदर्भात गुरुवारी पोलिस अधीक्षक डॉ.जे.डी.सुपेकर यांच्यासोबत युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. या वेळी पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव आदी उपस्थित होते.
पुढील आठवड्यात गणेश चतुर्थी असल्याने दोन-तीन दिवस आधीपासूनच मूर्ती आणि पूजेचे साहित्य विक्रेते शास्त्री टाॅवर ते घाणेकर चौकापर्यंत स्टॉल लावतात. शहरातील अजिंठा चाैफुली, बहिणाबाई उद्यान परिसर, कालीकामाता मंदिर परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल किंवा तंबू लागतात. या विक्रेत्यांकडून माेठ्या प्रमाणात वसुली करून पािलकेत प्रत्यक्षात डेली वसुली जमा केली जात असल्याच्या तक्रारी समाेर आल्या होत्या. या गैरव्यवहाराला आळा बसण्यासाठी आठ दिवसांसाठी पूजेचे साहित्य विक्रेत्यांना ३०० रुपये, लहान मूर्ती विक्री करणार्‍या तसेच छाेट्या स्टॉलधारकांसाठी ६०० रुपये तर माेठ्या स्टॉलधारकांसाठी ९०० रुपये फी आकारणी केली जाणार आहे. संबंधितांनी पैसे भरल्यावर पावत्या दिल्या जाणार असून त्याची तपासणी केली जाणार आहे. ज्यांनी फी भरण्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.