आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तितूर नदीवर ११ सिमेंट बंधारे, कामाचा झाला शुभारंभ, काेट्यवधीचा निधी मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - नदी पुनर्जीवन अभियानांतर्गत तालुक्यातील वाघळी येथे तितूर नदीवर सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार उन्मेष पाटील पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही कोटी ७० लाखांची सिंचनाची कामे अाहेत.
या प्रकारचे एकूण ११ बंधारे तितूर नदीवर बांधण्यात येणार असल्याने पावसाळ्यात वाहून जाणारे नदीचे पाणी अडवले जाऊन परिसरातील गावांमध्ये जलसमृद्धी निर्माण होईल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच तितूर नदीवर बंधारे होत असल्याने वाघळीसह पातोंडा, ओझर, बोरखेडा, हिंगोणे गावातील ग्रामस्थांनी उन्मेषदादा पाटील यांचे आभार मानले. आमदार आदर्शगाव योजनेत घेतलेले वाघळी गाव हे राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी रोल मॉडेल बनवण्याचा आमचा संकल्प असून त्यासाठी गाव परिसरात जिल्हा परिषद अंतर्गत ३६ लाखांचे खोलीकरणासह सिमेंट नालाबांध, कृषी विभागाच्या माध्यमातून ९० लाखांचे नवीन खोलीकरणसह सिमेंट नालाबांध १२ सिमेंट नालाबांध खोलीकरण, लघुसिंचन विभागामार्फत ४१ लाखांचे नवीन खोलीकरणासह सिमेंट नालाबांध अशी कामे सुरु करण्यात आहेत. चाळीसगाव तालुक्यातील इतर गावांमध्ये देखील येत्या काळात मोठ्याप्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेची सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार उन्मेष पाटील यांनी या वेळी दिली. बंधारे बांधले गेल्याने तितूर नदीचे पाणी अडविता येणार अाहे. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पुराचे पाणी सरळ वाहून जात हाेते.

मान्यवरांची उपस्थिती
मुधईमाता मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पोपट भोळे सरपंच विकास चौधरी, उपसरपंच, डॉ. एम. डी. पाटील, संजय पाटील, भाईदास नाना खैरे, मधूमामा, शिवाजी धनगर, सोपान तात्या, नारायण देवा, मजरे, शिवदास महाजन, सुरेश महाराज हिगोणे, युसूफ शेख, दीपक परदेशी जामडी, बालू आण्णा, देविदास महाजन, उत्तम महाजन पातोडा, दिनकर आबा, कारभारी गुजर ओझर, रामकृष्ण आबा आदी पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातम्या आणखी आहेत...