जळगाव ‘दिव्यमराठी’च्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव या अभियानांतर्गत गुरुवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील केंद्रीय विद्यालयात गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्वत: तयार केलेल्या शाडू मातीच्या मूर्तींची विद्यार्थी घरी स्थापना करणार आहेत. या ३०० विद्यार्थ्यांनी मिळून प्रयत्न केल्यानंतर प्रशिक्षणाच्या शेवटी सुमारे १०० मूर्ती पूर्णपणे तयार झाल्या. आता दोन दिवसांत त्यांना नैसर्गिक रंगाने रंगवून तयार केले जाईल. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय विद्यालयाच्या डॉ. अनिता पाटील, हरित सेनेचे मास्टर ट्रेनर प्रवीण पाटील, सामाजिक वनीकरण विभागाचे सर्वेक्षक सुभाष इंगळे, प्रा. डिगंबर कट्यारे, खगाेल अभ्यासक सतीश पाटील, सहायक लागवड अधिकारी एस. आर. शिरसाळे आदी उपस्थित होते. डॉ. अनिता पाटील, सुभाष इंगळे प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे महत्त्व सांगितले. या वेळी विनित वडेरा, नंदकिशोर देशपांडे, इश्वर देशपांडे, भूषण भावसार यांनी सहकार्य केले. कार्यशाळेसाठी ‘दिव्य मराठी’चे माध्यम प्रायोजकत्व मिळाले आहे.
केंद्रीय विद्यालयात तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींसमवेत विद्यार्थी प्रशिक्षक.
विविध आकार साकारले
याकार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गणेशाची विविध रुपे साकारली. गौरी गणपती, बाहुबलीच्या वेशातील गणेश, लालबागचा राजा गणपती, अष्टविनायक गणपती, गणपती महेश-पार्वती, शिवरुपी गणपती, पूजा करणारे गणपती, अशी अनेक रूपे साकारली आहेत.
निर्माल्यसंकलनाचा संकल्प
पर्यावरणपूरकगणपती मूर्तीची स्थापना करुन निर्माल्य संकलनचा संकल्प केला. १० दिवसातील संकलित निर्माल्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विसर्जन करुन मूर्तींचे घरातच बादलीत विसर्जित करून ते पाणी झाडांना देण्याचाही संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
अभियान