आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचा कारभार होणार पेपरलेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मोदी सरकारने देशभरातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजात पारदर्शकता आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात पेपरलेस कामकाज या संकल्पनेची अंमलबजावणी सुरू आहे. कागदाच्या माध्यमातून पैसा आणि कामकाजात इंटरनेटचा वापर वाढवून वेळेची बचत, असे यामागील धोरण आहे.

रेल्वे मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी देशभरातील रेल्वेचे महाप्रबंधक, डीआरएम यांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला रेल्वेमंत्र्यांनी पेपरलेस कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली. दैनंदिन कामकाज करताना कागदपत्रांचे गठ्ठे तयार होतात. ही कागदपत्रे गुंडाळून ऐनवेळी एखादा महत्त्वाचा कागद शोधणे मोठेच दिव्य ठरते. कागदपत्रांचा वापर आणि तयार झालेले रेकॉर्ड सांभाळताना वेळ आणि पैशांचा चुराडा होतो. हे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी पेपरलेस कारभाराचे फर्मान काढले आहे. भुसावळ विभागाचे मुख्यालय म्हणजेच डीआरएम कार्यालयापासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

कार्यालय प्रमुखांची बैठक
रेल्वे मंत्र्यांच्या बैठकीहून परतलेले डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी विभागातील सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेऊन पेपरलेस कामकाजाबाबत नियोजन केले. परिणामी वेगवेगळ्या विभागातील अत्यंत जुनी कागदपत्रे, फाइल्स, कागदांचे गठ्ठे बाहेर निघत आहेत. त्याची छाननी करून अनावश्यक कागदपत्रे नष्ट केली जाणार आहेत.
कागदाऐवजी पेनड्राइव्हचा पर्याय
डीआरएम कार्यालयात दैनंदिन कामकाजानिमित्त कागदपत्रांची होणारी देवाण-घेवाण 90 टक्केबंद झाली आहे. कागदाऐवजी ही माहिती आता संगणकावर तयार करून त्या-त्या विभागांना पेनड्राइव्हद्वारे पुरवली जाते. आवश्यक तेव्हाच कागदाचा उपयोग केला जातो. मुंबई, दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयांचे प्रस्ताव मेलद्वारे रवाना होतात.
बहुसंख्य कार्यालये चकाचक
अनावश्यक कागदपत्रे बाहेर काढल्याने रेल्वे मुख्यालयातील बहुसंख्य कार्यालये चकाचक झाली आहेत. एखाद्या महत्त्वाच्या फाइलचे आयुष्य किती वर्ष आहे? याची माहिती घेऊन ती फाइल ठेवायची किंवा नष्ट करायची? याचा निर्णय घेतला जातो. जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंतचे रेकॉर्ड ठेवणे सुरू आहे. यापेक्षा जास्त जुने आणि महत्त्वाचे रेकॉर्ड संग्रही ठेवले जाते. बिनकामाच्या फाइल्स रद्दीमध्ये काढणे सुरू आहे.

इंटरनेटचा वापर वाढणार
४पेपरलेस कामकाज संकल्पनेची अंमलबजावणी डीआरएम कार्यालयापासून होईल. यामुळे कागदाची बचत होईल. इंटरनेटद्वारे माहितीचे आदान-प्रदान झाल्यास टपालाद्वारे होणारा विलंब दूर होईल.
महेशकुमार गुप्ता, विभागीय रेल्वे प्रबंधक, भुसावळ