आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य रेल्वेत ‘ग्रुप डी’च्या 1164 उमेदवारांच्या नियुक्तीस टाळाटाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मुंबई रेल्वे भरती कमिटी (आरआरसी)ने 2007 मध्ये भरती केलेल्या ‘ग्रुप डी’च्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करूनही त्यांना सेवेत घेतले नाही. याबाबत मंगळवारी खासदार हरिभाऊ जावळे यांनी डीआरएम महेशकुमार गुप्ता यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
देशभरात रेल्वे विभागात ग्रुप डीची भरती करण्यात आली. मात्र, मध्य रेल्वेत या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी होऊनही सेवेत का घेतले नाही? असा सवाल खासदार जावळे यांनी केला. डीआरएम गुप्ता यांनी हा विषय आरआरसीच्या अंतर्गत येतो, असे सांगितल्यावर जावळे यांनी जीएम आणि खासदार अनंत गिते यांच्याशी चर्चा केली. या प्रo्नावर पंधरवड्यात तोडगा काढण्यासाठी आपण पाठपुरावा करावा, अशा सूचना गुप्ता यांना दिल्या. दरम्यान, ग्रुप डीच्या पदासाठी वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. लवकरात लवकर नियुक्ती न मिळाल्यास थेट रेल्वेखाली आत्महत्या करू. याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असा खळबळजनक इशारा दिला.
पाठपुरावा करणार
रेल्वे रिक्रूटमेंट कमिटीतर्फे ग्रुप डीच्या कर्मचार्‍यांची भरती केली जाते. ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. कमिटीने या उमेदवारांना सेवेत घेतल्यावर आम्ही विविध विभागात कामे देऊ. यासंदर्भातील सर्व निर्णय महाव्यवस्थापकांच्या माध्यमातून होतात. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. आम्हीदेखील पाठपुरावा करू. महेशकुमार गुप्ता, डीआरएम, भुसावळ
रेल्वे थांब्याची मागणी
पुणे- पटना एक्स्प्रेसला रावेर येथे, तर सुरत-अमरावती एक्स्प्रेसला विदर्भातील बिचवा ब्रिच येथे थांबा मिळावा, अशी मागणी या वेळी जावळे यांनी केली. बिचवा ब्रिच येथे केवळ पादचारी पूल नसल्याने रेल्वे रुळ ओलांडताना नागरिकांचे बळी जातात. या मुळे येथे तत्काळ पादचारी पूल उभारावा यासह विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
  • डीआरएम म्हणाले 1200 कोटी उत्पन्न असताना 1450 कोटीचा खर्च होतो
  • भुसावळ-जळगाव तिसर्‍या मार्गासाठी 300 कोटींचा बजेट, निधी मात्र अत्यल्प
  • रावेर स्थानकावर पटना-पुणे एक्स्प्रेसला थांबा मिळवण्यासाठी होणार प्रयत्न