आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव दुचाकीस्वारांनी देवपुरात खेचल्या दाेन महिलांच्या साेनपाेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - देवपुरातलागाेपाठ दाेन महिलांच्या धूमस्टाइलने साेनपाेत लंपास केल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी पाेलिसांत नाेंद करण्यात अाली अाहे. मात्र, अाराेपी कृत्य करून पसार झाले. नकाणे राेड अाणि दत्त मंदिर परिसरातील वृंदावन काॅलनीत ह्या घटना घडल्या. दाेन्ही घटनेत एकूण पन्नास हजारांचा मुद्देमाल लुटण्यात अाला. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अाहे.
देवपुरातील वृंदावन काॅलनीत पुन्हा धूमस्टाइल महिलेची वीस हजार रुपये किमतीची साेनपाेत लंपास करण्यात अाली. लाल रंगाच्या माेटारसायकलवर अालेल्या दाेघांकडून हा प्रकार करण्यात अाला. मंगलमूर्ती साेसायटीतील प्लाॅट नं. १३५मध्ये राहणाऱ्या शीला रामराव लाेहार (वय ४८) ह्या घरासमाेर राहणाऱ्या श्रीमती माळी यांच्याकडे साड्यांना पिकाेफाॅल करण्यासाठी साड्या घेऊन गेल्या हाेत्या. तेथून परत येत असताना वृंदावन काॅलनीतील रस्त्यावर हीराे हाेंडा कंपनीच्या लाल रंगाच्या माेटारसायकलवर अालेल्या दाेघांनी त्यांच्या गळ्यातील साेनपाेत हिसकावून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्या गाेंधळल्या. अारडाअाेरड करेपर्यंत संबंधित चाेरटे पसार झाले हाेते. दाेन्ही तरुण हे २५ ते ३० वयाेगटातील हाेते. या घटनेत शीला लाेहार यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची २० हजार रुपये किमतीची साेनपाेत चाेरीला गेली. तर दुसरी घटना नकाणे राेडवर पती-पत्नी दूध घेण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या माेटारसायकलवर अालेल्या दाेघांनी महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची साेनपाेत लांबवल्याची घटना घडली. रंजना दगडूसिंग देवरे (५०, रा. प्रमाेद नगर, सेक्टर नं. प्लाॅट नं. ६६, नकाणे राेड) ह्या अापल्या पतीबराेबर नकाणे राेडवरील मूकबधिर शाळेजवळ असलेल्या कृष्णा डेअरीत दूध घेण्यासाठी गेल्या हाेते. तेथून परत पायी जात असताना मूकबधिर शाळेसमाेरील बाेळीतून वळल्यानंतर काळ्या रंगाच्या माेटारसायकलवर डबलसीट अालेल्या दाेघांनी त्यांच्या गळ्यातील साेन्याची मंगलपाेत खेचून नेली. त्यात चाेरट्यांच्या हातात साेन्याचे मणी दाेन वाट्यांचे मंगळसूत्र लागले. घटनेनंतर चाेरटे पसार झाले. घटनास्थळी पाेलिस निरीक्षक पी. डी. पाडवी यांनी भेट दिली. या परिसरातील ही चाैथी ते पाचवी घटना अाहे. तरीही पाेलिसांना अद्याप चाेरट्यांना शाेधण्यात यश अालेले नाही. लागाेपाठ घडलेल्या या दाेन्ही घटनांमुळे देवपुरात पुन्हा धूमस्टाइल साेनपाेत चाेरी करण्याची हिंमत वाढल्याचे दिसून येते. याबाबत महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अाहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक व्ही. एस. पाटील, एस. के. पाटील हे करीत अाहेत.

काॅलन्यांमध्ये रेकी
काॅलनी परिसरात साेनपाेत चाेरीच्या घटना माेठ्या प्रमाणावर घडत अाहेत. या भागात महिला एकट्या फिरायला निघाल्या की, त्यांच्यावर नजर ठेवून घटना घडवल्या जातात.

साेनपाेत चाेरीतून घबाड
रात्रीच्या सुमारास चाेरी करूनही हाती काही येत नाही, हे पाहून चाेरट्यांनी साेनपाेत चाेरीकडे लक्ष वळविले अाहे. यात घबाड तातडीने हाती लागते. त्याचा फायदा धूमस्टाइल वाहने घेऊन फिरणाऱ्यांनी घेतला अाहे. तातडीने पैसे मिळवून देण्याचा उद्याेग म्हणून याकडे चाेरटे पाहतात. मात्र पाेलिसांची पथके यात अकार्यक्षम ठरतात. मुळात शहरात नीटपणे टेहळणी केली तर चाेरटे जेरबंद हाेणे कठीण ठरणार नाही.

त्यांना मानसिक धक्का
साेनपाेत खेचून नेल्यानंतर रंजना देवरे यांना मानसिक धक्का बसला. त्यांची मन:स्थिती बिघडली. याबाबत दाेन्ही महिलांनी दिलेल्या वेगवेगळ्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविरुद्ध साेनपाेत लुटीप्रकरणी भादंवि कलम ३९२,३४ नुसार रस्तालूट, चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. काही भरधाव वाहनचालकांवर लक्षही ठेवायला सुरुवात केली अाहे. संशयितांचे रेखाचित्रही तयार केले जाईल.
बातम्या आणखी आहेत...