आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना शहरात फिरणे अवघड; ‘सीसीटीव्ही’चा प्रस्ताव लटकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सोन साखळीचोरी,छेडछाडीच्या घटनांमुळे शहरातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून एकापाठोपाठ घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे. गेल्या महिनाभरात शहरात सोनसाखळी चोरीच्या सात घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी गस्त वाढवल्या. कारवाई केली तरीही दरवेळी नवीन चोरटे हाती लागत असल्यामुळे पोलिसांसमोरील डोकेदुखीही वाढली आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा पोलिसांचा प्रस्तावही लटकला आहे. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने महापालिका प्रशासनाने सीसीटीव्हीचा खर्च उचलण्यास नकारघंटा दर्शवली आहे.

शहरात मंगळवारी रात्री रेल्वेस्थानक, बळीरामपेठ परिसरात मोटारसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी जबरी चोरी केली होती. त्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन तासांत दोघांना ताब्यात घेतले होतेे. मात्र, त्यानंतर सलग दुसऱ्या दविशी बुधवारी रात्री सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. शहरात महिनाभरात तर जिल्हाभरात सुमारे ७१ सोनसाखळीचोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी ७१ पैकी ५४ घटना उघडकीस आणल्या असून दोन महिन्यांत पाच चोरट्यांना जेरबंद केले आहे. तसेच जून ते आॅगस्टदरम्यान रिगरोड, मू.जे.महाविद्यालय परिसर, आयएमआर महाविद्यालय परिसर, कांचननगर, सिव्हिल हाॅस्पिटल आदी पाच छेडछाडीच्या घटना घडल्या. त्यामुळे महिलांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे.

{ जुलै आंबेडकर मार्केट
{ ११ जुलै कासमवाडी बाजार
{ १७ जुलै ख्वाजामियाँ चौक
{ २४ जुलै प्रेमनगर
{ ११ आॅगस्ट रिंग रोड, जि. प.
{ १२ आॅगस्ट शिवतीर्थ मैदान

एलसीबीने महिन्यांत पकडले चोरटे
जिल्ह्यातसात महिन्यांत ७१ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. यातील ५४ घटना उघडकीस आल्या असून एलसीबीने पाच चोरट्यांना जेरबंद केले आहे. गणपतीनगरात रजनी अत्तरदे यांची सोनसाखळी चाेरल्याप्रकरणी २५ मे रोजी चेतन पाटील, हर्षल भावसार यांना अटक केली होती. ३० मे रोजी आदर्शनगरातील निर्मलाबाई शिसोदे यांची सोनसाखळी दोन चोरट्यांनी लांबवली होती. यातील सादिक अली इराणीला जूनला भुसावळ येथून अटक केले होते. २५ जुलै रोजी बोदवड ये‌थील कस्तुराबाई घुले यांची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी सदिक अली शेरू सल्तनत इराणी यांना अटक केली होती.

११ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर आिण १२ आॅगस्ट रोजी बळीरामपेठेतील सारस्वत बँकेसमोर सोनसाखळी चोरीचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी आर्या हाॅटेलचे आिण प्रकाश मेडिकल स्टोअर्सचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दोन्ही चोरींच्या वेळी संशयितरीत्या फिरणाऱ्या मोटारसायकलस्वारांचे फोटो वेगळे काढून ते जिल्हाभरात पाठवले आहेत.
सुरक्षा धोक्यात | सोनसाखळीचोरी, छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
जळगाव महिलासुरक्षा समितीच्या बैठकीत शहरातील प्रमुख चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. तसेच ही जबाबदारी पालिकेने पार पाडावी, असाही सूर निघाला. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संपूर्ण नियंत्रण पोलिस प्रशासनालाच करावे लागणार असल्याने खर्चदेखील पोलिसांनीच करावा, असा पालिका प्रशासनाचा सूर आहे.

पोलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे १२ जूनला महिला सुरक्षा समितीची बैठक झाली होती. या बैठकीत शहरातील मुख्य मार्गांसह कॉलन्यांमधील पथदविे बंद असल्याने गैरप्रकार घडतात. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील प्रमुख चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यावर चर्चा झाली होती. यासंदर्भातील इतविृत्त मनपालाही प्राप्त झाले असून, विद्युत विभागातर्फे पथदवि्यांच्या दुरुस्ती कामांना सुरुवात झाली आहे. त्यासाठी लागणारा खर्चदेखील मनपाच्या फंडातून होत आहे; परंतु फुले मार्केटसह घाणेकर चौक ते टाॅवर चौक, घाणेकर चौक ते सुभाष चौक, सराफ बाजार आदी महत्त्वाच्या चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या विषयावरही चर्चा सुरू झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, त्यांचे संपूर्ण नियंत्रण पोलिसांनाच करावे लागणार आहे.
दरवेळी नवे चोरटे हाती लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली