आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा दोन सोनसाखळीचोर जेरबंद, सुप्रीम काॅलनीतून घेतले ताब्यात; दुचाकी जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गिरणा टाकीजवळ हरिविठ्ठलनगरातील महिलेची सोनसाखळी लांबवल्याप्रकरणी सोमवारी एलसीबीने सुप्रीम कॉलनीतून दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

गिरणा टाकीजवळ १६ रोजी दुपारी १.३० वाजता दोन चोरट्यांनी हरिविठ्ठलनगरातील सुनंदा ठाकूर या महिलेची ग्रॅम वजनाची १५ हजारांची सोनसाखळी लांबवली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. संबंधित महिलेने चोरट्यांच्या सांगितलेल्या वर्णनावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला होता. चोरट्यांबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने सुप्रीम कॉलनीत सापळा लावला होता. या वेळी अर्जुन विजयसिंग बागडे (वय २७) बलवीर बहादूर भाट (वय २४) हे दोघे एमएच-१९-एव्ही-५७२५ या दुचाकीवरून जात होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सुरुवातीला दोघे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पथकाने दोघांना संशयित म्हणून अटक केली. तसेच कसून चौकशी केल्यानंतर दोघांनी सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. दोघांचा इतरही गुन्ह्यांत सहभाग असण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकते असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गेंदालाल मिलमध्ये ‘कोम्बिंग’
स्थानिकगुन्हे शाखा शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या संयुक्त वदि्यमानाने सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. तसेच गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी रेल्वेस्थानक परिसरातील लॉजेसची तपासणी करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी ३६ कर्मचारी, तर शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी १९ कर्मचाऱ्यांच्या पथकाचा समावेश होता. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक लगड संदीप पाटील यांच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनद्वारे तीन हिस्ट्रीशिटर रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांची झडती घेतली. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश इंगळे यांच्या पथकाने गुन्हेगारांच्या शोधासाठी रेल्वेस्थानक परिसरातील साईसागर बॉम्बे लॉजची तपासणी केली.

सोनसाखळ्या चोरीप्रकरणी एलसीबीने शनिवारी सुनीतादेवी ऊर्फ मुन्नी बन्नेसिंग जालमसिंग सासी ऊर्फ बिमला सूरज हिला अटक केली होती, तर तिची दोन्ही मुले संजय बनवारीलाल लालसिंग रामसिंग हे पसार झाले होते. त्यांना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कदम, नीता मांडवे इतर सात जण बिमलाला घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत.

महिलांनादागिने परत करणार : ज्यामहिलांच्या सोनसाखळ्या चोरीस गेल्या आहेत, त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत बोलावण्यात येणार आहे. दागिन्यांची ओळख पटल्यानंतर ते दागिने संबंधित महिलांना सन्मानपूर्वक परत करण्यात येतील, असे एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले.
बिमला सूरजसह एलसीबीचे विशेष पथक दिल्लीला रवाना