आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमधे सोनसाखळीचोराने वयोवृद्ध महिलेला नेले 15 फूट फरपटत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सोनसाखळी चोरट्यांचा उच्छाद मोठय़ा प्रमाणात वाढला असून, पोलिस यंत्रणा त्यांचा बंदोबस्त करण्यात फेल ठरत असल्याचा प्रत्यय गुरुवारी आला. जिल्हापेठमधील पद्मालय भोजनालयात सायंकाळी 5.45 वाजता नीलिमा कुरंगे (वय 60) या वयोवृध्द महिलेला चोरट्यांनी चक्क 15 फूट फरपटत नेत 30 ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबवली. महिनाभरात भरदिवसा नागरिकांशी संवाद साधून नंतर सोनसाखळी लांबविण्याचा हा दुसरा प्रकार घडला आहे.

कुरंगे ह्या पद्मालय भोजनालयात लग्न समारंभासाठी जेवणाची ऑर्डर देण्यासाठी आल्या होत्या. सायंकाळची वेळ असल्यामुळे भोजनालयात केवळ एक-दोन वेटर होते तर मालक वरच्या मजल्यावर होते. मालकांची वाट पहात कुरंगे ह्या सोफ्यावर बसल्या. तेवढय़ात बाहेरून खांद्यावर सॅक अडकवलेला एक 20-22 वर्षांचा युवक आला. त्याने पाणी प्यायचे असे हिंदीमध्ये आजींना विचारले. आजींनी त्याला किचनकडचा रस्ता दाखवला. याच क्षणी त्या युवकाने आजींच्या गळ्यातील सोनसाखळी तोडली.

चोरट्यांची आजीला मारहाण
चोरा पळत असताना आजीने विरोध करीत त्याचा टी शर्ट, सॅक घट्ट पकडून ठेवली. त्यामुळे स्वत:ची सुटका करताना चोरट्याने आजीला मारहाण करत त्यांच्या हात आणि डोळ्याला दुखापत केली. चोरटा पसार झाल्यानंतर आजीला विचारपूस केल्यावर त्यांनी र्शीकांत वाणी यांना फोनवर संपर्क साधायला सांगितले. वाणी यांनी घटनास्थळ गाठत त्यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.