आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायी चालत-चालत मंगळसूत्रावर डल्ला, घरफोड्यांनंतर साखळी चोरट्यांचा धुमाकूळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरफोड्यांनंतरआता चोरट्यांनी पुन्हा एकदा सोनसाखळी पळवण्याकडे मोर्चा वळवला आहे. आधी दुचाकीने भरधाव येत सोनसाखळ्या पळवणारे चोरटे आता पायीच येऊन कामगिरी करीत आहेत, अशीच एक घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजता आयएमआर कॉलेज परसिरात घडली.

दादावाडी परसिरात राहणाऱ्या हेमलता प्रशांत चव्हाण (वय २३) ह्या आयएमआर कॉलेज जवळील गंधर्व कॉलनी येथून पायी जात होत्या. याच वेळी एक चोरटा पाठीमागून आला. त्याने तुम्हाला आबांनी प्रसाद घेण्यासाठी बोलावले आहे, असे सांगितले. चव्हाण यांचे लक्ष विचलित होताच, क्षणातच चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तोडून पळ काढला. चव्हाण यांनी आरडा-ओरड करेपर्यंत चोरटा बेपत्ता झाला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चोरटा पाच फूट उंच, रंगाने काळा-सावळा, अंगात अबोली रंगाचा शर्ट तपकिरी रंगाची पॅण्ट होती, असे वर्णन चव्हाण यांनी पोलिसांना सांगितले आहे.