आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या दुचाकीवरून सोनसाखळी लांबवली, सोनसाखळी चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरफोडीच्या घटनेनंतर आता सोनसाखळी चोरांनी शहरात धुमाकूळ सुरू केला आहे. आदर्शनगरात रविवारी १०.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धावत्या दुचाकीवरून एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवल्याची घटना घडली.

आदर्शनगरातील पस्वस्तिक अपार्टमेंटमधील अरुणा नंदलाल चौधरी (वय ४४) या रविवारी सागरपार्क येथील इंद्रदेव महाराजांच्या महोत्सवाला गेल्या होत्या. तेथून त्या प्रमिला गायकवाड, प्रमिला चौधरी, चंद्रकला पाटील, गाैरी प्रधान यांच्यासोबत परत येत होत्या. त्या वेळी आदर्शनगरातील आेम अपार्टमेंट समोरून एक िवनाक्रमांकाची पांढऱ्या काळ्यारंगाची दुचाकीवर २५ ते ३० वयोगटातील तरुण आले. त्यातील मागच्या तरुणाच्या पाठीवर काळ्यारंगाची सॅक होती. दुचाकीचालकाने काळ्या पांढऱ्या रंगाच्या चौकटीचा शर्ट घातला होता. दोघांनी हाफ पंॅट घातली होती. मागे बसलेल्या तरुणाने चौधरी यांच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाची ६० हजाराची सोनसाखळी गळ्यातून आेढून पळ काढला. चौधरी यांच्या माहितीवरून पोलिसांनी िसंधी काॅलनी आिण महाबळ परिसरातून आठ तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात पल्सर, सीबीझेड, यामाहा आर १५ गाड्यांवर हे तरुण िफरत होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.