आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनसाखळी चोर पाचव्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या दोन्ही आरोपींना सोमवारी रामनंदनगर पोलिसांनी पाचव्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले आहे. रविवारी रामानंदनगर पोलिसांनी त्यांना चौथ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी त्यांना न्यायाधीश ए.एम.मानकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ मे रोजी चेतन पाटील आणि हर्षल भावसार यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी नंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांसाठी त्यांना ताब्यात घेतले होते.
रामानंद नगरच्या हद्दीत दोन चोऱ्या
नाशिक येथील रजनी अत्तरदे यांनी ग्रॅम वजनाची २० हजार रुपयांची सोनसाखळी अज्ञात चाेरट्यांनी लंपास केल्याची तक्रार रामानंदनगर पोलिसांत दिली होती. याप्रकरणी दोघांना रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर एम.जे.कॉलेजच्या मागील रस्त्यावर १२ जानेवारी २०१५ रोजी दुपारी ३.४५ वाजता अलका कांतीलाल जैन (रा.शनिपेठ) यांच्या गळ्यातून ४.५ तोळ्यांची लाख १० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबवण्यात आली होती. याप्रकरणीही रामानंदनगर पोलिस कर्मचाऱ्यांनी चेतन आणि हर्षलला पुन्हा ताब्यात घेतले होते.
कारागीर आकाशला कोठडी
सोनसाखळी चोरीप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी आकाश सोनार या सराफा व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या कारागिरास रविवारी अटक केली होती. त्यांच्याकडून १५ ग्रॅम सोने जप्त केले होते. त्याला सोमवारी न्यायाधीश मानकर यांच्यासमोर हजर केले असा त्यांनी आकाशला न्यायालयीन कोठडी सुनावली.