आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रभाग सभापती निवडणूक बिनविराेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनपाप्रभाग समिती सभापती निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची शनिवारी शेवटची मुदत होती. त्यात खान्देश विकास आघाडीच्या ३, तर राष्ट्रवादीचा अशा चारच उमेदवारांनी अर्ज भरले. भाजपच्या नगरसेवकांनी अर्ज घेऊनही मुदतीत अर्ज भरता एका प्रकारे माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
प्रभाग समिती क्रमांक १साठी खाविआचे दत्तात्रय कोळी, दोनसाठी इकबाल पिरजादे, तीनसाठी हेमलता नाईक चारसाठी राष्ट्रवादीच्या शोभाबाई बारी यांची निवड निश्चित झाली आहे. तसेच तीन जागा खाविआने ठेवल्या अाहेत, तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देण्यात आली आहे. सोमवारी निवडणुकीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे.

पक्षीय बलाबल असे
प्रभागसमिती क्रमांक एकमध्ये खाविआचे १२, राष्ट्रवादीचे २, महानगर विकास आघाडीचा १, भाजपचे अपक्ष नगरसेवक आहे. दोनमध्ये खाविआचे ११, राष्ट्रवादीचे २, मनसेचे भाजपचे नगरसेवक आहेत. तीनमध्ये खाविआचे ६, राष्ट्रवादीचा १, भाजपचे शिवसेनेचा असे नगरसेवक आहेत. चारमध्ये खाविआचे ४, राष्ट्रवादीचे मनसेचे असे नगरसेवक आहेत.

मनसे राहिली दूर
नुकत्याच झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने खाविआने गड राखला. त्यात मनसेला उपमहापौरपद दिले. भाजपने ही निवडणूक लढवली. मात्र, त्यांना यश आले नाही. आता प्रभाग समिती निवडणुकीत मनसे दूर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देण्यात आली. गेल्या वेळी मनसेच्या नितीन नन्नवरे यांच्यासाठी शोभाबाई बारी यांना माघार घ्यावी लागली होती. यंदा त्यांना संधी देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...