आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chalisgaon Agriculture Exhibition From 8 January

9 जानेवारीपासून भरेल कृषी प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - स्व. अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त 9 ते 12 जानेवारी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजीव देशमुख यांनी कृषी प्रदर्शनाबाबत माहिती पत्रकार परिषदेत दिली.

शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञान व शेतीच्या आधुनिक विविध उपक्रमांची माहिती व्हावी, कृषीविषयक शासकीय योजना, आधुनिक शेती अवजारे, प्रक्रीया उद्योग, बचगटांमार्फत तयार करण्यात येणार्‍या साहित्यांचे प्रदर्शन, पशुधन विकासाची माहिती, पुस्तक स्टॉल, खते, बियाणे, औषधे या विषयांची ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना प्रदर्शनातून चांगली माहिती मिळावी यासाठी प्रदर्शन आयोजिले असल्याचे आमदार देशमुख म्हणाले. यावेळी देखरेख संघाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, बाजार समितीचे सभापती अँड.रोहिदास पाटील, उपसभापती जालम पाटील, उपनगराध्यक्ष प्रदीप निकम, रामचंद्र जाधव, प्रमोद पाटील, दिलीप चौधरी, अरविंद सूर्यवंशी, बाजार समितीचे सचिव एस. आर खंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार देशमुख यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील शेतकरी शेती व्यवसायावर अवलंबून असतो. त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहचत नाही. प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यास कृषी योजनांचा परिचय होईल. प्र्दशनात शेतामध्ये राबविण्यात आलेल्या उत्पादकता वाढीचे विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. शेती विकासातून शेतकरी विकास ही संकल्पना घेऊन एक लाख शेतकरी कृषी प्रदर्शनात सहभाग नोंदविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्र्दशनात अंधांची राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा आयोजिली आहे.

पशुपालकांचा गौरव
पशुधन संगोपन महत्व ओळखून कृषी प्रदर्शान सवोत्कृष्ठ पशुपालकांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रदर्शनात कृषी विषयक हजार विविध पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल असतील. केळी, कापूस, सोयाबीन, आले-हळद, प्रक्रीया उद्योग, विविध पुस्तके प्रदर्शनात असतील.