आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळिसगाव सशस्त्र दरोड्या प्रकरनी चार जणांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- चाळीसगाव येथील सशस्त्र दरोड्याच्या घटनेनंतर शहरातील पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांची तपासणी सुरू केली आहे. बाजारपेठचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील स्वत: रात्री गस्त घालून गुन्हेगारांची चौकशी करत आहेत. आगामी काळातील सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोक्का कायद्यांतर्गत शहरातील चार जणांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगार सध्या कोणता व्यवसाय करतात, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात तपासणीची मोहीम राबवली. शुक्रवारी रात्री वाजेपर्यंत पोलिस निरीक्षक नजनपाटील यांनी आरोपींच्या घरी जाऊन महिती घेतली. एकूण ३० जणांची शुक्रवारी रात्री चौकशी करण्यात आली. तसेच मध्यरात्री पोलिसांनी नाकाबंदीही केली होती. नाकाबंदीत नाहाटा चौफुलीसह अन्य ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली.

माहितीलादिला दुजोरा
बाजारपेठपोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. जवळपास १८ जणांच्या गुन्ह्यांची कुंडली पोलिसांनी तयार केली आहे. त्या कुंडलीच्या आधारे संबंधितांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. याबाबीला पोलिस निरीक्षक नजनपाटील यांनीही दुजोरा दिला आहे. तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांचीही माहिती काढली जात आहे. शहर ठाण्याच्या हद्दीतील संबंधितांविरुद्धही हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत.

चौघांची नावे नश्चित
पोलिसप्रशासनातर्फे हद्दपारीसोबतच गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विघ्नसंतोषींविरुद्ध ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. पोलिसांच्या यादीवरील शहरातील चार जणांची नावे मोक्का कायद्यांतर्गत कारवाईसाठी पोलिसांनी नश्चित केली आहेत. मात्र, चौघांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

प्रस्तावांचे काम घेतले हाती
आगामीसणवारांच्या पार्श्वभूमीवर हद्दपारी मोक्कांतर्गत थेट कारवाई होणार आहे. यासाठी संबंधितांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलिस प्रशासनाने हाती घेतले आहे. लवकरच दोन्ही प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. मंजुरीनंतर कारवाई केली जाईल. रोहिदास पवार, डीवायएसपी,भुसावळ
गुन्हेगारांची यादी तयार केली
वरिष्ठांच्याआदेशानुसार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. दाेन पेक्षा अधीक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांची माहिती काढली आहे. संबंधितांविरुद्ध मोक्का किंवा हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार केले जात आहे. किसनराव नजनपाटील, पोलिसनिरीक्षक,बाजारपेठ
बातम्या आणखी आहेत...