नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रातील ३ परिचारिकांसह ३५ जणींना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पदक, प्रशस्तीपत्र, आणि ५० हजार रूपये पुरस्काराचे स्वरूप आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावत येथील आरोग्य सेविका चंद्रकला चव्हाण, अमळनेर तालुक्यातील ढेकु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका कल्पना गायकवाड यांना गौरवण्यात आले.