आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chandrakant Hari Badhe Co Op Society Issue Bhusawal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आम्ही फक्त सह्याजीराव; 'बढे'च्या माजी संचालकांचे पालकमंत्र्यांना निवेदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत माजी संचालकांच्या जंगम मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बढे पतसंस्थेच्या माजी संचालकांनी सोमवारी पालकमंत्री संजय सावकारे यांना दिले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेचा कारभार चंद्रकांत बढे यांनीच पाहिला आहे. त्यांनी जेथे सांगितले तेथे फक्त आम्ही सह्या केल्या आहेत. न्यायालयात खटला सुरू असतानाच सहकार विभागातर्फे आमच्या वडिलोपार्जित जंगम मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकार विभागाने जर लिलावाच्या प्रक्रियेला स्थगिती दिली नाही तर 16 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही बढे पतसंस्थेच्या माजी संचालकांनी दिला आहे. निवेदनावर गणेश झोपे, नंदकुमार भंगाळे, डिगंबर सुरवाडे, हिरालाल पटेल, प्रतापराव देशमुख, नथ्थू झोपे, बळीराम माळी, नामदेव मोरे, शकुंतला थोरात, विजय वाघ या माजी संचालकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.