आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाही शेतकऱ्याची तक्रार आल्याने 10 हजारांच्या कर्जाचा विषय संपला; महसूल मत्र्यांचा तक्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यशासनाने शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली अाहे. या याेजनेचा भाग म्हणून शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रूपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला हाेता. १० हजारांचे कर्ज मिळाले नसल्यास तक्रार करण्याचे अावाहन अाम्ही शेतकऱ्यांना केले हाेते. मात्र, एकही शेतकऱ्याने यासंदर्भात तक्रार केलेली नाही. त्यामुळे १० हजारांच्या कर्जाचा विषय अाता संपलाय, असा तर्क महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढला अाहे. जळगावात ते पत्रकारांशी बाेलत हाेते. 

कर्जमाफीचे अाॅनलाइन अाणि अाॅफलाइन असे १० लाख शेतकऱ्यांचे अर्ज अाले अाहेत. सन २००८-०९ मध्ये अनेक चुकीच्या लाेकांना माफी मिळाली. या वेळी मात्र याेग्य अाणि गरजू शेतकऱ्यांना ती मिळावी म्हणून अाॅनलाइन यंत्रणा काम करत अाहे. यापूर्वीच्या कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी १४ महिने लागले हाेते.यावेळी मात्र अाधीचा अनुभव पाहत काळजी घेतली जात अाहे. कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकरी सुकाणू समिती करत असलेले अांदाेलन स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर करणे अत्यंत चुकीचे अाहे. साॅप्टवेअरमार्फत याद्या जाहीर झाल्यानंतर पुढील दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. दिड लाखापर्यंत कर्ज असलेल्या ३१ लाख शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ हाेणार असल्याचे पालकमंत्री या वेळी म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...