आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा बदल केल्याने संजीव पाटलांचा वाचला जीव!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘चाळीसगावहूनसुरतसाठी जाणाऱ्या बसमधून गुरुवारी मी धुळ्याला जात हाेताे. बस निघाली त्या वेळी मी चालकाच्या बाजूला बसलाे हाेताे. परंतु अपघाताच्या पाच मिनिटाअाधीच एका ज्येष्ठ सहप्रवाशाने जागा बदलून देण्याची विनंती केली. त्यांची विनंती मी मान्य करत दुसऱ्या जागेवर जाऊन बसलाे अाणि पाच मिनिटात हाेत्याचे नव्हते झाले. मी वाचलाे, पण माझ्या जागेवर बसलेल्या त्या सहप्रवाशाचा मात्र मृत्यू झाला. या घटनेत त्या सहप्रवासाचा मृत्यू झाल्याचे पाहून मी काही काळ स्वत:लाही विसरलो होतो. आता ही आठवण आली की, माझा अंगाचा थरकाप उडतो,’ अशी आपबिती धुळ्यातील संजीव पाटील या वृत्तपत्र विक्रेत्याने िदव्य मराठी’शी बाेलताना कथन केली.

गुरुवारी चाळीसगावजवळील चिंचगव्हाण फाट्याजवळ बस-कंटेनरचा भीषण अपघात झाला. यात चालकाच्या बाजूने बसलेल्या सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेत अायुष्याची दाेरी बळकट हाेती म्हणूनच संजीव पाटील यांचे प्राण वाचले. मात्र सहप्रवाशी गेल्याचे शल्य मात्र त्यांना बाेचत आहे. आजही त्या प्रवाशाचे शब्द त्यांच्या कानावर आहेत. ‘अाप पिछे बैठाेगे क्या? मुझे तकलीफ हो रही है’ त्या वयाेवृद्ध व्यक्तीच्या विनंतीस मान देऊन संजीव पाटलांनी जागा बदलून घेतली. ही जागा बदलल्यानंतर अवघा पाच मििनटात भीषण अपघात झाला. यात संजीव यांचा जीव वाचला. धुळे येथील रहिवासी असलेले संजीव पाटील हे ‘दिव्य मराठी’चे चाळीसगाव येथील वृत्तपत्र विक्रेते अाहेत. ते दरराेज पहाटे २.३० वाजेच्या बसने धुळ्याहून चाळीसगाव येथे येतात वृत्तपत्र वितरणाचे काम झाल्यावर दुपारी धुळ्याला जातात. गुरुवारी धुळ्याला परत जाताना हा अपघात झाला. यात त्यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे.

प्रवाशांची केली मदत
पहिले१० ते १५ मिनिटे काेणतीच मदत पाेहचली नव्हती. तेव्हा अपघातातून बचावलेले सहप्रवासीच सभाेवतालचे भयानक चित्र पाहून भेदरलेल्यांपैकी काही जणांनी स्वत:ला सावरत जखमींना मदत केली. जखमींना सीट एस.टी.च्या पत्र्याखाली अडकलेल्यांना काढणे, काेणाचे काय झाले, याची िवचारपूस करून घटनास्थळी मदत केली.
पाचचा असाही याेगायाेग
संजीवपाटील हे चाळीसगाव येथून धुळे जाण्यासाठी दुपारी १.३० वाजता बसमध्ये बसले. त्यांना हिंदीत बाेलणाऱ्या सुमारे ५५ वर्षीय व्यक्तीने जागा बदलून बसण्याची विनंती केली. त्यांच्यात सुमारे वर्षांचे अंतर हाेते. हा भीषण अपघात झाला त्या अगाेदर जागा बदलण्यात अाली ते अंतरही सुमारे पाच किलाेमीटरच दूर हाेते. तर जागा बदलल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत हा अपघात घडला.
बातम्या आणखी आहेत...