आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमळनेरच्या महिलांमध्‍ये ज्वेलरीचा बदलता ट्रेंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - जगासोबत आपणही बदलले पाहिजे, याची जाणीव ठेवत महिला आता बदलता ट्रेंड स्वीकारत आहेत. अमळनेरसारख्या शहरात विविध प्रकारच्या ज्वेलरी व व्हाइट मेटलच्या वस्तूंचा चांगलाच व्यवसाय सुरू केला आहे.
अमळनेर येथील काही महिलांनी गृहोद्योगाच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे दररोज त्या विविध फॅन्सी ज्वेलरी व अनेक प्रकारचे व्हाइट मेटल सेट विक्री करतात. सामान्य ते उच्चभ्रू महिला आता या महिलांकडे अनेक प्रकारच्या वस्तू विकत घेण्यासाठी येत असतात. घरातील एकटेपण अथवा दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये न रमता शहरातील काही महिलांनी आपला व्यवसाय सुरू केला असून त्यामुळे त्यांना रोजगारही उपलद्ध झाला आहे. गेल्या काही वर्षापासून होत असलेल्या चोरीच्या संख्या पाहता सध्या सोन्याच्या वस्तू परिधान करून फिरणे अवघड बनले आहे. त्यामुळे महिला आता सावधानी बाळगायला लागल्या आहेत. हेच की काय म्हणून यासाठी महिला आता फॅन्सी ज्वेलरीकडे वळल्या आहेत. कारण या ज्वेलरीची चोरी झाली तरी आर्थिक झळ जास्त बसत नाही.

महिलांचा बदलता ट्रेंड
इतर महिला काय वापरतात? आपण काय घेतले पाहिजे? याकडे महिलांचे बारीक लक्ष असते. पूर्वी एखादी साडी परिधान करणार्‍या स्त्रीकडे दोनचार साड्या असत. मात्र, आता 50 साड्या महिलांकडे दिसू लागल्या आहेत. तसाच प्रकार ज्वेलरीतही आहे. विविध समारंभांना जाणार्‍या महिला सध्या फॅशनच्या दुनियेत रमल्या आहेत. नेहमीच सोने का वापरावे? मग सोन्यासारखे दिसणारे पण सोने नव्हे, अशा बेंटेक्सचा बोलबाला वाढला. या दागिन्यांची चोरी झाली तरी जास्त आर्थिक नुकसान होत नाही व दु:खही कमी होते. त्यामुळे अँन्टिक ज्वेलरीचा वापर महिलांना सुरक्षित वाटू लागला आहे.

सौंदर्याला झळाळी ज्वेलरीची
फॅन्सी ज्वेलरीच्या दुनियेत आता चक्रावून टाकणारे प्रकार दिसून येत आहेत. या अँन्टिक ज्वेलरीत पोलकी, कुंदन, वन ग्रॅम फॉरमिंग, एडी ज्वेलरी, अमेरिकन डायमंड, इमिटेशन ज्वेलरी, साडी पिन, बॅँगल्स, तोळे कंगण, पायल, मॅचिंग ज्वेलरी असे नाना प्रकार दाखल झाले आहेत. यापूर्वी केवळ र्मयादित शहरातील घटकांपर्यंत असलेली फॅशन आता या महिलांनी तालुकापातळीपर्यंत या निमित्ताने पोहचवली आहे.

किचनही झगमगीत
कोल्हापुरी पद्धतीच्या चांदीच्या वस्तू म्हणजेच व्हाइट मेटल. हा तर मनीषा कोठारी यांचा ठोक व्यवसाय आहे. यात 200 रुपयांपासून ते दोन हजारांपर्यंतचे भोजन सेट, लेमन सेट, तूप वाढी, ड्रायफ्रू ट सेट, इटालियन सेट, पूजा थाली, लग्न समारंभात दिले जाणारे आहेर सेट, ग्लास सेट आदी वस्तू मध्यमवर्गीयांच्या घरातही चमकू लागल्या आहेत.
संसारासह मुलाबाळांचे शिक्षण उत्तम व्हावे, यासाठी व्यवसाय सुरू करण्याची कल्पना डोक्यात आली. पतींनी पूर्वी मोठय़ा ज्वेलर्सकडे काम करून व्यवसायाचे शिक्षण घेतले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नवा व्यवसाय करता येईल का? यासाठी विचार केला. त्यानंतर हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून आपल्याच समाजापर्यंत सिमित न राहता सर्व समाजाशी ऋणानुबंध वाढवले. लोकांचे येणे-जाणे वाढले, सर्वांशी व्यवसायिक नाते जुळले. ग्राहक समाधानी असल्याच्या अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत. मनीषा कोठारी, व्यावसायिक.