आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - एक घास चिऊचा, चिऊताई चिऊताई दार उघड, यासारख्या बालगोष्टी आपण ऐकतच लहानाचे मोठे झालो. पहाट होताच चिमण्यांचा चिवचिवाट वातावरणात स्फूर्ती आणतो, अशी ही चिमणी तुमच्या-आमच्या आयुष्यात अविभाज्य घटक होती. मात्र, मानवाची बदलती जीवनशैली, बेसुमार वृक्षतोडीमुळे कोंदट झालेले वातावरण आणि वाढते प्रदूषण या चिमुकल्या पक्ष्यांसाठी घातक ठरत आहे. आपल्या जळगाव शहरातच गेल्या 10 वर्षांत चिमण्यांचे प्रमाण 20 टक्क्यांनी घटले आहे.
दोन प्रकारच्या चिमण्या
शहरात ‘हाऊस स्पॅरो’ आणि ‘यलो थ्रोटेड स्पॅरो’ (पीतकंठी चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या आढळतात. जगभरात चिमण्यांच्या 26 प्रजाती आहेत. तर 12 उपप्रजाती आहेत.
बदलते राहणीमान : घरात धूळ येऊ नये म्हणून स्लायडिंगच्या खिडक्या, तर डास येऊ नये म्हणून जाळ्या बसवल्या जातात. त्यामुळे चिमण्यांना घरात प्रवेश मिळत नाहीच, शिवाय बाहेरही घरटी करण्यासाठी जागा मिळत नाही.
वाढते प्रदूषण : हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषण त्यांच्यासाठी अतिशय घातक वाहनांचे कर्णकर्कश हॉर्नही त्यांना विचलित करतात.
शिसेरहीत पेट्रोलचा वापर : पक्ष्यांचा अभ्यास करणार्या शाखेला ‘आर्निथॉलॉजी’ असे म्हणतात. या क्षेत्रात डेनिस समर-स्मिथ थिअरीचा अभ्यास महत्त्वपूर्ण मानला जातो. या थेअरीप्रमाणे जगभरात चिमण्यांचे प्रमाण कमी होण्याचे कारण शिसेविरहीत पेट्रोलचा वापर असे सांगितले आहे. त्यामुळे वातावरणातील लहान किडे मारले जातात. हे किडे चिमण्यांचे मुख्य अन्न आहे. हे अन्न पिलांसाठी पोषक असते. पोषक अन्न न मिळाल्याने चिमण्यांमध्ये बालमृत्यूदर वाढला आहे.
वातावरणाशी जुळवणे कठीण
चिमणी मानवावर अवलंबून असलेला पक्षी आहे. मात्र मानवानेच जीवनशैली बदलल्याने चिमण्यांना नव्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण होत आहे. चिमण्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी ते घटलेले नाही. अभय उजागरे, पक्षीमित्र
कृत्रिम घरटींचे वितरण
चिमण्या मानवाला उपयोगी आहेत. पिकांचे नुकसान करणारे असंख्य कीटक, अळ्या त्या खातात. मावा, तुडतुडे, मुंग्या, उधई त्यांचे खाद्य आहे. त्यामुळे चिमण्या टिकल्या तरच नागरी जीवन टिकेल. चिमण्यांच्या संवर्धनासाठी आम्ही कृत्रिम घरटी वितरित करीत आहोत. उमेश इंगळे, ऑर्किड नेचर फाउंडेशन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.