आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण; युवकाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव - प्रेमसंबंध असल्याचा आरोप करून दोघांनी एका युवकाला बुधवारी बेदम मारहाण केली हाेती. तसेच मारहाणीचे मोबाइल रेकॉर्डिंगही केले. याचा धसका घेऊन संबंधित युवकाने गुरुवारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अात्महत्यापूर्वी युवकाने चिठ्ठी लिहून ‘दोषींना शिक्षा व्हावी’, अशी मागणी केली अाहे. केदार सुभाष पाटील (२६) असे मृताचे नाव आहे.
 
केदारचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे याच भागात राहणाऱ्या गजेंद्र न्हावी व गौरव सोनवणे यांनी केदारला बुधवारी रात्री निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण करत त्या महिलेचा नाद साेड अशी धमकी दिली हाेती.
बातम्या आणखी आहेत...