आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charge Filed Against Privat Money Lenders In Jalgoan

खासगी सावकारांवर गुन्हा दाखल, जिल्ह्यात पहिलाच गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - खासगी सावकारांनी पैशांसाठी लावलेल्या तगाद्यामुळे शेतकऱ्याने अात्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे चार सावकारांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात अाला. जिल्ह्यात खासगी सावकारांविरूद्ध दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा अाहे.
तालुक्यातील मुडी येथील शेतकरी दिनेश बडगुजर (वय ४३) याने खासगी सावकारांकडून कर्ज घेतले हाेते. त्या सावकारांकडून कर्जासाठी तगादा सुरू झाला. यामुळे दिनेश यांनी २७ मार्च रोजी शेतात कीटकनाशक घेतले. त्याला धुळे रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. यावेळी मारवड पोलिसांनी त्याचे जबाब घेतले. यात त्याने गुलाब भिकारी बडगुजर, भागवत संतोष बडगुजर, नारायण वेडू पाटील, संजय गुलाब पाटील यांच्याकडून कर्ज घेतले हाेते. त्यासाठी साडेतीन बिघे शेत चाैघांचा नावावर करूनही िदले हाेते. त्यानंतरही त्यांच्याकडून कायम पैशांचा तगादा सुरू होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. त्यानंतर तीन एप्रिल रोजी मारवड पोलिस ठाण्यात मुंबई सावकारी कायदा १९४६ चे कलम ३२(ब)३३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दिनेश याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असून अद्यापही त्याची प्रकृती गंभीर आहे.