आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charge Sheet Filed Ragarding Journalist Naresh Sonar Death

पत्रकार नरेश सोनार मृत्यूप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - पठाणकोट एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात परप्रांतीय प्रवाशांनी चाळीसगाव येथील पत्रकार नरेश सोनारला मारहाण करून गाडीच्या बाहेर फेकले होते. 14 नोव्हेंबर 2013 ला झालेल्या या घटनेत सोनारचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या 89 व्या दिवशी मंगळवारी (दि.11) भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे न्यायालयात 468 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
नरेश सोनार चाळीसगाव येथून पठाणकोट एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात बसून रावेरकडे निघाले होते. प्रवासादरम्यान जागा आणि पिशवीच्या कारणावरून परप्रांतीय तीन युवकांनी त्यांना मारहाण केली. रावेर रेल्वेस्थानकावरून बळजबरीने गाडीत ओढून नेले. यानंतर पुढे बर्‍हाणपूरजवळ रेल्वे रुळावर सोनार यांचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी उत्तर प्रदेशातून तीन संशयितांना अटक केली होती.

संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणार्‍या या घटनेच्या 89 व्या दिवशी (11 फेब्रुवारी 2014) तपासाधिकारी दिलीप ठाकूर यांनी न्यायाधीश मनीष फटांगरे यांच्या न्यायालयात 468 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील सुभाष कासार यांनी सहकार्य केले. दरम्यान, अटकेतील तिन्ही आरोपी सध्या जिल्हा कारागृहात आहे. पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी, गुन्हे शाखेचे सुरेश पडधन उपस्थित होते.